आजपासून UPI देवाण-घेवाणची मर्यादा बदलली

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pradnya Shinde • 2 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

आजकाल सर्वकाही डिजिटल झाले आहे. सध्या तर कोणतेही व्यव्हार ऑनलाइन पद्धतीने केले जातात. सर्वजण यूपीआयच्या माध्यमातून पैसे पाठवतात. यूपीआयमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. आता पैसे ट्रान्सफर करण्याची लिमिट वाढवण्यात आली आहे. १६ सप्टेंबरपासून यूपीआयमध्ये पैसे ट्रान्सफर करण्याची मर्यादा वाढणार आहे.

आरबीआयने दिलेल्या निर्देशानुसार, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने यूपीआय ट्रान्झॅक्शन लिमिट वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.आरबीआयने पतधोरण बैठकीनंतर ही घोषणा केली होती. याबाबत पेमेंट सर्व्हिस प्रोवायडर आणि बँकांनाही माहिती दिली आहे.

NPCI च्या नवीन नियमानुसार, आता तुम्ही कर भरण्यासाठी युपीआयद्वारे ट्रान्सफर करु शकतात. रुग्णालयातील बिल, शैक्षणिक खर्च, IPO आणि RBI च्या योजनांमध्येही ५ लाख रुपयांपर्यंतचे व्यव्हार करणे शक्य होणार आहे. ५ लाखांपर्यंतचे व्यव्हार तुम्हाला सर्व ठिकाणी करणार आहे. याशिवाय यूपीआय लवकरच UPI सर्कल सुरु करण्यात आली आहे.

सध्या इतर सर्व यूपीआय व्यव्हारांसाठी १ लाख रुपयांची मर्यादा आहे. म्हणजे तुम्ही दिवसभरात १ लाखांपर्यंत पैसे पाठवू शकतात.तसेच बँकादेखील ही मर्यादा ठरवू शकतात. अलाहाबाद बँकेची यूपीआय मर्यादा २५,००० रुपये आहे. तर एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँकेतून तुम्ही १ लाखांपर्यंत व्यव्हार करु शकतात.

UPI सर्कल काय आहे? 
यूपीआय लवकरच नवीन फीचर लाँच करणार आहे. यूपीआय सर्कल सुरु करणार आहे. यूपीआय सर्कलमुळे आता तुम्ही ५ मोबाईलवर एकच यूपीआय आयडी वापरता येणार आहे. त्यामुळे यूपीआय सर्कलमुळे तुम्ही आणि तुमचे नातेवाईक एकच यूपीआय आयडी वापरुन पैसे पाठवू शकतात.