काश्मीरच्या अखनूरमधील चकमकीत तीन दहशतवादी ठार

Story by  Sameer D. Shaikh | Published by  Fazal Pathan • 25 d ago
प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र

 

जम्मू-काश्मीरच्या अखनूरमध्ये सोमवारी सुरू झालेली चकमक  मंगळवारी सकाळी १० वाजून २७ मिनिटांनी संपला. सुरक्षा रेषेजवळील  (LOC) डील भट्टल भागातील जंगलात सुरक्षा दलाने तिन्ही दहशतवाद्यांचा खात्मा केलाय. यापूर्वी एका दहशतवाद्याचा मृतदेह सापडला होता. आज सकाळी आणखी दोन दहशतवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत.

या अतिरेक्यांनी सोमवारी सकाळी ७.२६ वाजता रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेवर हल्ला केला होता. मात्र त्यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. हल्ल्यानंतर दहशतवादी जंगलाच्या दिशेने पळून गेले. त्यानंतर सुरक्षा दलांनी शोध मोहीम राबवली आणि सुमारे पाच तासांच्या प्रयत्नांनंतर तिन्ही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.

चकमकीत K9 फँटम डॉग फ्लॅशस्टोन शहीद
चमकित लष्कराच्या के-9 पथकातील कुत्रा फँटमला गोळ्या लागल्या. त्यात तो शहीद झाला. याविषयी जम्मू डिफेन्स पीआरओ म्हणाले, 'आम्ही आमच्या कुत्र्या फँटमच्या सर्वोच्च बलिदानाला सलाम करतो. जेव्हा आमचे सैनिक अडकलेल्या दहशतवाद्यांच्या जवळ आले तेव्हा फँटमवर दहशतवाद्यांनी गोळीबारात केला, त्यात तो जखमी झाला आणि काही वेळातच त्याचा मृत्यू झाला.

सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले की, भट्टल भागातील जंगलाला लागून असलेल्या शिव आसन मंदिरात दहशतवादी मोबाईल फोन शोधण्यासाठी आले होते. त्यांना कुणालातरी फोन करायचा होता. दरम्यान, लष्कराची रुग्णवाहिका पुढे सरकली आणि दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. सीमा ओलंदुन अखनूर येथे काल रात्री दहशतवादी आले असावेत, असे सांगण्यात येत आहे.

एका आठवड्यातील पाचवा हल्ला
१६ ऑक्टोबरपासून जम्मू-काश्मीरमधील हा 5वा हल्ला आहे. या हल्ल्यात 3 जवान शहीद झाले आहेत. त्याच वेळी, ८ गैर-स्थानिक लोकांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी झालेले हल्ले -

२४ ऑक्टोबर: बारामुल्ला येथे लष्कराच्या वाहनावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी PAFF संघटनेने घेतली. हल्ल्यानंतर दहशतवादी जंगलाच्या दिशेने पळून गेल्याचे पोलिसांनी सांगितले.
२४ ऑक्टोबर: दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील बटगुंडमध्ये दहशतवाद्यांनी एका मजुरावर गोळीबार केला.  हल्ला झालेला कामगार जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
२० ऑक्टोबर: सोनमर्ग, गांदरबल येथे काश्मीरमधील एक डॉक्टर, एमपीचा एक इंजिनियर आणि पंजाब-बिहारमधील ५ ज्येष्ठ नागरिक यांच्यावर हल्ला करून त्यांना ठार केले. या हल्ल्याची  जबाबदारी लष्कराच्या द रेझिस्टन्स फ्रंट (TRF) किंवा संघटनेने घेतली.
१६  ऑक्टोबर : शोपियानमध्ये दहशतवाद्यांनी एका गैर-स्थानिक तरुणाची गोळ्या घालून हत्या केली. हल्ल्यानंतर परिसरात दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी शोध मोहीम सुरू करण्यात आली.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter