बाबा सिद्धिकींच्या तीन मारेकऱ्यांना अटक

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pradnya Shinde • 1 d ago
Baba Siddiqui's Death
Baba Siddiqui's Death

 

शनिवारी रात्री अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्धिकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली असून आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं. यातील धर्मराज राजेश कश्यप (वय १९) या आरोपीची वयाची चाचणी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तर गुरमैल बलजीत सिंह (वय २३) याला २१ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच यातील दोन आरोपी अद्यापही फरार आहेत. शिव कुमार गौतम उर्फ शिवा (२०) आणि मोहम्मद झीशन अख्तर, असं या आरोपीचे नाव आहे. यात मोहम्मद झीशन अख्तर यानेच हत्येसाठी हत्यार पुरवल्याचा संशय पोलिसांना आहे.

न्यायालयात काय घडलं?
यावेळी युक्तिवाद करताना सरकारी वकील न्यायालयात म्हणाले आहेत की, आरोपींना घटनस्थळावरून अटक करण्यात आलीय आहे. त्यांच्याकडे आम्हाला आधार कार्ड सापडलं. त्यात धर्मराज कश्यपचे वय १९ आहे. आरोपींकडे काही पुरावे नाही. प्रथमदर्शनी त्यांच वय १९ दिसतंय. खोटं आधार कार्ड देखील आरोपींनी बनवलं असं शकतं.

यावरच आपली बाजू मांडताना बचाव पक्षाचे वकील म्हणाले की, जर आधार कार्ड आमचं खोटं आहे तर पोलिसांनी तसे पुरावे सादर करावे. यानंतर न्यायालयाने कश्यपचे जन्माचा दाखला दाखवण्यास सांगितलं आहे. यावर बचाव पक्षाचे वकील म्हणाले की, जन्माचा दाखल आता नाही, मात्र आरोपी वयाची चाचणी करण्यास तयार आहे.

१४ दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी
यानंतरत सरकारी वकिलांनी न्यायालयात १४ दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. यावेळी सरकारी वकील न्यायालयात म्हणाले की, या गुन्ह्याने संपूर्ण मुंबई हादरली आहे. माजी राज्यमंत्र्याची हत्या झाली आहे. अंगरक्षक असताना हत्या झाली. हत्या झालेली व्यक्ती साधी नाही. आरोपी काही दिवस पुण्यात होते, काही दिवस मुंबईला होते. त्यांनी रेकी केली. यांना हत्यार कोणी पुरवले. आरोपींचा नेम अचूक आहे.

आरोपींकडे २८ जिवंत काडतुसे सापडली
प्रशिक्षण कुठे घेतलं. गुन्ह्याची व्याप्ती देशाबाहेर देखील आहे. आरोपींकडे २८ जिवंत काडतुसे सापडली. एकाला मारायचं होत की, आणखीन कोणाला मारायचं होतं. यांचा उद्देश काय आहे, हे शोधणं महत्त्वाचं आहे. अजून दोन आरोपी फरार आहेत. हे कोणत्या आंतरराष्ट्रीय गँगशी निगडित आहेत का? निवडणुका आल्या आहेत निवडणुकीमुळे हत्या झाली का, असे अनेक प्रश्न आहे सरकारी वकिलांनी उपस्थित केले. तसेच राजकीय हेतूने हत्या झाल्याचा सरकारी वकिलांनी संशय व्यक्त केला आहे.

तपासासाठी १० टीम तयार करण्यात आल्या आहेत
यावेळी युक्तिवाद करताना बचाव पक्षाचे वकील म्हणाले की, यांनीच गुन्हा केला, हे अद्याप स्पष्ट नाही. कोणत्या आरोपीकडून बंदूक जप्त केली आहेत? कॅश काही जप्त केली आहे? याचा कसलाही उल्लेख रिमांड कॉपीमध्ये नाही. कमीत कमी कोठडी द्यावी, ही आमची मागणी आहे. यानंतर सरकारी वकील म्हणाले की, १० टीम तयार करण्यात आल्या आहेत. पुण्याला काय करत होते, कुठे राहत होते, याचा सगळ्याचा तपास करायचा आहे. प्लॅन अगदी अचूक पद्धतीने तडीस नेला. सरकारी पक्षाने कश्यपचे आधार कार्ड यावेळी न्यायालयात सादर केलं. ज्यात त्याचा जन्म १ मार्च २००३ चा असल्याचं लिहिलं आहे.