दिल्लीत प्रदूषणामुळे दरवर्षी जातोय 12 हजार जणांचा बळी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pradnya Shinde • 3 d ago
भारतातील हवा प्रदूषण
भारतातील हवा प्रदूषण

 

दिल्लीत प्रदूषणामुळे दरवर्षी १२ हजार लोकांचा मृत्यू, महाराष्ट्रातली शहरं पण आघाडीवर मात्र मोठा शहरांमध्ये या पार्टीकलची संख्या चांगलीच वाढत आहे. पर्यायी देशातील मोठा शहरांमध्ये एकूण मृत्यूंपैकी ७ % मृत्यू हे वायू प्रदूषणामुळे होत असल्याचे निदर्शनास येत आहे. एका हेल्थ जर्नल मध्ये प्रकाशित झालेल्या अहवालात हे म्हटले आहे.

या अहवालानुसार दिल्ली, मुंबई, बंगलोर, हैदराबाद, कोलकत्ता, पुणे, वाराणसी, चेन्नई या शहरांमध्ये हवा खराब झाली आहे. यामुळे नागरिकांच्या फुफूसांना हानी पोहोचत आहे. श्वास घेणंही कठीण झालं आहे. 

मर्यादेनुसार पीएम २.५ पार्टिकल्स हा हवेच्यालेवल मध्ये १५ मिनी ग्रॅम पेक्षा कमी हवा. मात्र मोठ्या शहरांमध्ये ही मर्यादा भेदली जात असून याचा थेट परिणाम हा नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. नागरिकांच्या आरोग्यावर सर्वाधिक परिणाम किंबहुना धोका हा दिल्लीमध्ये पाहायला मिळत आहे. फॅक्टरी आणि वाहनांमधून निघणाऱ्या धुरामुळे नागरिकांना हा त्रास होत असल्याचे म्हटले जात आहे.