एआयच्या वापरावर बंदी नाही, मात्र सुरक्षेला प्राधान्य - केंद्रीय मंत्री जितेंद्रसिंह

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 3 d ago
एआयविषयी माहिती देताना केंद्रीय मंत्री जितेंद्रसिंह
एआयविषयी माहिती देताना केंद्रीय मंत्री जितेंद्रसिंह

 

कृत्रिम बुद्धिमतेवर (एआय) आधारित साधनांच्या वापर आणि त्याचा स्वीकार करण्यावा कोणत्याही सरकारी विभागाकडून कोणतीही बंदी नाही. हे एक नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान असून नागरिका केंद्रित वेब प्रणाली आहे, असे केंद्रीय कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तिवेतन मंत्रो जितेंद्रसिंह यांनी गुरुवारी सांगितले. सरकारी अधिकारी ‘चॅट जीपीटी’सारख्या प्रणालींचा वापर अहवाल तयार करण्यासाठी किंवा मजकूर बनवण्यासाठी करतात का, या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हे स्पष्ट केले.

ते म्हणाले, “एआय आधारित तंत्रज्ञानाच्या वापरावर कोणतेही विशेष निर्बंध सरकारी विभागांवर नाहीत. हे एक नवतंत्रज्ञान असून नागरी सेवांसाठी वेब आधारित प्रणालीची मोठी क्षमता पात आहे. अधिकारी एआय'चा वापर करीत असल्याची  मंत्रालयामध्ये कोणतीही अधिकृत नोंद नाही.” 

 पुढे ते म्हणाले, “चॅट जीपीटी’सारख्या प्रणालींच्या वापरावर कोणतीही बंदी नसली तरी कोणतेही डिजिटल तंत्रज्ञान किंवा व्यासपीठ वापरताना शासकीय अधिकाऱ्यांनी सार्वजनिक माहितीची गोपनीयता आणि सुरक्षितता जपण्यासाठी आवश्यक खबरदारी घ्यावी. सायबर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे बंधनकारक आहे. या सूचनांनुसारच कोणत्याही प्रणाली किंवा साधनांचा वापर नियंत्रित केला जातो.” 

एआय सारख्या तंत्रज्ञानामुळे प्रशासकीय कामकाजात गती आणि अचूकता येऊ शकते. अहवाल तयार करणे, माहितीचे विश्लेषण करणे आणि दस्तऐवजांचा मसुदा बनवणे यासारख्या कामांसाठी हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरू शकते. जितेंद्रसिंह यांच्या मते, ही प्रणाली नागरिकांच्या सोयीसाठी आणि सरकारी सेवांच्या सुधारणेसाठी एक मोठा आधार बनू शकते. तरीही, याचा वापर करताना सुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे.  

 सरकार नवतंत्रज्ञानाच्या स्वीकारासाठी सकारात्मक आहे. एआय सारख्या साधनांचा वापर वाढत असताना, याचा योग्य वापर आणि सुरक्षितता यांचा समतोल साधणे हे प्रशासनासमोरील आव्हान असेल. हे तंत्रज्ञान सरकारी विभागांना अधिक कार्यक्षम बनवू शकते आणि नागरिकांना चांगल्या सेवा देण्याच्या दिशेने एक पाऊल ठरू शकते. मात्र, यासोबतच सायबर सुरक्षेच्या बाबतीत जागरूकता आणि जबाबदारी वाढवणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter