25th Kargil Vijay Divas : मुशर्रफ आणि गॅंगने कसा रचला कट

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pradnya Shinde • 1 Months ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

'गँग ऑफ फोर' ही संज्ञा परवेझ मुशर्रफ यांच्या चार जनरल एहसान उल हक, जनरल अजीज खान, महमूद अहमद आणि शाहिद अजीज यांच्यासाठी वापरली जाते. (General Pervez Musharraf and Gang of Four)

कारगिल युद्धात भारताने पाकिस्तानचा दारुण पराभव केला होता. देशातील शूर सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दरवर्षी २६ जुलै रोजी भारतात कारगिल विजय दिवस साजरा केला जातो. दुसरीकडे, पाकिस्तानमध्ये हा दिवस 'गँग ऑफ फोर'ची भयंकर चूक म्हणून लक्षात ठेवला जातो. पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती जनरल परवेझ मुशर्रफ यांना या टोळीचा नेता म्हटले जाते. मुशर्रफ यांनी भारतासोबतच्या युद्धासाठी कारगिल युद्धाची योजना आखली होती.

'गँग ऑफ फोर' हा शब्द परवेझ मुशर्रफ यांच्या चार सेनापतींच्या संदर्भात वापरला जातो. त्यात जजनरल एहसान उल हक, जनरल अजीज खान, महमूद अहमद आणि शाहिद अजीज यांचा समावेश होता. हे चौघेही पाकिस्तानी लष्करात जनरल होते. या लोकांसह परवेझ मुशर्रफ यांनी कारगिल युद्ध सुरू केले. यानंतर नवाझ शरीफ यांच्याविरोधात सत्तापालटही करण्यात आली. या चार अधिकार्‍यांच्या चुकीमुळे पाकिस्तानचे सुमारे १२०० सैनिक मारले गेल्याचे पाकिस्तानमध्ये बोलले जाते. या युद्धाने पाकिस्तानला अशा जखमा दिल्या, ज्या अद्यापही भरल्या नाहीत.

युद्धामुळे पाकिस्तानची आर्थिक स्थिती बिघडली
१९९९ मध्ये पाकिस्तानी घुसखोरांनी कारगिलची उंच शिखरे काबीज केली. यानंतर भारतीय लष्कराने ऑपरेशन विजय सुरू केले. या अंतर्गत मे ते जुलै १९९९ मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झाले होते. या युद्धात भारताचा विजय झाला आणि भारतीय लष्कराने पाकिस्तानी घुसखोरांना मारलेच नाही, तर कारगिलमधूनही हुसकावून लावले. युद्धामुळे पाकिस्तानची आर्थिक स्थितीही बिकट झाली. भारताने पाकिस्तानला समुद्रात रोखले.त्यामुळे त्यांच्या सागरी व्यापारावर मोठा परिणाम झाला आणि नवाझ शरीफ यांनीही हे मान्य केले.

कारगिल युद्धाच्या बदल्यात काश्मीर ताब्यात घेण्याची होती योजना
कारगिल युद्धाच्या वेळी जनरल परवेझ मुशर्रफ लष्करप्रमुख होते. त्याचवेळी जनरल अजीज खान हे चीफ ऑफ जनरल स्टाफ होते. याशिवाय अजीज आयएसआयमध्येही होता. या काळात ते काश्मीरची जबाबदारी सांभाळत होते. अजीजने पाकिस्तानी घुसखोरांना भारतीय सीमेवर पाठवायला सुरुवात केली आणि त्यातूनच काश्मीरमध्ये अशांतता पसरवली गेली.कारगिल युद्धाच्या बदल्यात काश्मीर ताब्यात घेण्याची या चार जनरल आणि मुशर्रफ यांची योजना होती. घुसखोरांना हटवण्यात भारतीय लष्कराला अडचणींचा सामना करावा लागेल, असे या लोकांना वाटत होते. पण तसे झाले नाही आणि कारगिल युद्ध भारताने जिंकले.
 
 

 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter