मणिपुरमध्ये तणावपूर्ण शांतता

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 2 Months ago
मणिपुरमध्ये हिंसाचार झाल्यानंतर तैनात सुरक्षा रक्षक
मणिपुरमध्ये हिंसाचार झाल्यानंतर तैनात सुरक्षा रक्षक

 

मणिपूरमधील जिरिबम येथील मैतेई समुदायातील तीन महिला आणि तीन बालके यांचे मृतदेह सापडल्याने शनिवारी संध्याकाळपासून येथे नव्याने हिंसाचार उसळला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मणिपूरमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचाराच्या घटना घडलेल्या पाच जिल्ह्यांमध्ये तणावपूर्ण शांतता आहे.

दरम्यान, संचार जबावाने मणिपूरमधील भाजपच्या तीन आमदारांची घरे पेटवून दिली. तसेच राज्याचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांचेही घर बाळण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी तो हाणून पाडला. राज्यात संचारबंदी लाग केली असूनदेखील येथे अनेक ठिकाणी हिंसाचार झाला. दंगलखोरांनी मणिपूरचे सार्वजनिक बांधकाममंत्री गोविंददास कौथोजम

भाजपचे आमदार वाय. राधेशाम व पॉनम ब्रोजेन यांच्या घरांवर हल्ला करून त्यांची घरे पेटवून दिली. त्याचप्रमाणे काँग्रेसचे आमदार लोकेश्वर यांचे घरदेखील दंगखोरांनी पेटवून दिले. शनिवारीदेखील राज्यातील काही मंत्र्यांच्या घरांवर हल्ल्याचा प्रयत्न झाला. यावेळी या आमदारांच्या घरांत कोणीही नसल्याने जीवित हानी झाली नसली तरी त्यांच्या घरांचे मोठे नुकसान झाले आहे.

ठळक घडामोडी
  • दंगलखोरांनी मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्या पिढीजात घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
  • अपक्ष आमदार सपम निशिकांता याच्या मालकीच्या वृत्तपत्र कार्यालयाची नासधूस.
  • इंफाळ पूर्व, विष्णुपुरा, धौबल, काकचिंग, कांगपोंग, चुरचुंदापूर येथे शनिवारी संध्याकाळपासून दोन दिवसांसाठी इंटरनेट सेवा बंद.
  • विधिमंडळाच्या इमारतीपासून अवघ्या २०० मीटर अंतरावर दंगलखोरांनी टायर जाळले. जिरबम येथे दोन प्रार्थना स्थळांना आग.

ना एक, ना सेफ : खर्गे
मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचाराला सुरुवात झाल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. 'मणिपूर ना एक आहे, ना सेफ आहे,' असे म्हणत राज्यातील जनता तुम्हाला क्षमा करणार नाही, अशा शब्दांत खर्गे यांनी समाजमाध्यमातून केंद्रातील सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter