'इस्राईलला शस्त्रसाठा पुरवू नका'

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 11 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

‘इस्त्राईलला शस्त्रास्त्रे तसेच लष्करी उपकरणांची निर्यात करण्यास प्रतिबंध घालण्याचे निर्देश केंद्र सरकारला दिले जावेत,’ अशी विनंती करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. नोएडा येथील रहिवासी अशोककुमार शर्मा यांच्यासह अकरा व्यक्तींनी ही याचिका दाखल केली आहे.

सार्वजनिक क्षेत्र तसेच खासगी क्षेत्रातील कंपन्यांकडून इस्राईलला मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे आणि लष्करी उपकरणांची निर्यात सुरू आहे. ज्या भारतीय कंपन्या इस्राईलला शस्त्रांची निर्यात करीत आहेत अशा कंपन्यांचे परवाने रद्द केले जावेत अशी मागणी जनहित याचिकेतून करण्यात आली होती. इस्राईल आणि हमास दहशतवादी संघटनेदरम्यान सुरू असलेल्या युद्धात चाळीस हजारपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला असल्याचा संदर्भ याचिकेत देण्यात आला आहे.

ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांतभूषण यांच्यामार्फत ही जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. ‘भारताकडून भिन्न आंतरराष्ट्रीय कायदे आणि नियमांचे पालन केले जाते. अशा स्थितीत युद्ध गुन्ह्यांमध्ये सामील असलेल्या देशांना भारत शस्त्रांची निर्यात करू शकत नाही,’ असा युक्तिवाद याचिकेत करण्यात आला आहे.