आम्हाला साथ द्या, तुम्हाला आपले मानू - राजनाथसिंह

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 8 d ago
राजनाथसिंह
राजनाथसिंह

 

जम्मू-काश्मीर विधानसभेच्या निवडणुकीत प्रचारासाठी आलेले संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी आज पाकव्याप्त काश्मीरमधील नागरिकांनाही भारतात येऊन साथ देण्याचे आवाहन केले. पाकिस्तान तुम्हाला विदेशी नागरिक मानत असला तरी आम्ही तुम्हाला आपले मानू, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

रामबन मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राकेशसिंह ठाकूर यांच्या प्रचारासाठी राजनाथसिंह यांनी आज सभा घेतली. यावेळी त्यांनी नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीवर जोरदार टीका केली. "या दोन्ही पक्षांना कलम ३७० पुन्हा लागू करायची इच्छा आहे. आम्ही मात्र तसे होऊ देणार नाही. हे कलम रद्द झाल्यानंतर जम्म काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात बदल घडून आले असून जनतेने या बदलांचे स्वागत केले आहे, येथील युवक आता बंदुका बाळगण्याऐवजी लॅपटॉप हतात भेत आहे. त्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबा चा, त्याआधारावर आम्ही येथे मोठा विकास घडवून आणू येथील विकासकामे पाहून पाकव्याप्त कायमीरमधील नागरिकांनाही आपल्याकडे यावेसे वाढायला हवे.

पाकिस्तान सरकार अद्यापही व्याप्त काश्मीरला 'विदेशी भूमी' असल्याचा दर्जा देत असल्याचे निदर्शनास आणून देत राजनाथसिंह यांनी पाकव्याप्त काश्मीरमधील नागरिकांना आवाहन केले की, पाकिस्तान तुम्हाला विदेशी नागरिक समजत असला तरी आम्ही उसे करणार नाही. तुम्ही इकडे या आणि आम्हाला साथ द्या, रागवन मतकासंघात भाजपच्या ठाकूर यांचा सामना नॅशनल कॉन्फरन्सचे अर्जुनसिंह राजू आणि पक्षातील बंडखोर नेते सुरजसिंह परिहार यांच्याशी होणार आहे. या जागेवर मागील निवडणुकीत भाजपचे नीलमकुमार लांगेह विजयी झाले होते.

मुख्यमंत्रिपदाबाबत आताच काही सांगणार नाही : कर्रा
जम्मूकाश्मरमध्ये कीिस आणि नैशनल कॉन्फरन्सच्या आघाडीची सत्ता आल्यास काँग्रेस किंवा नैशनल कॉन्फरन्ना यापैकी कोणत्या पक्षाचा मुख्यमंत्री असेल हे निण्डणुका होण्यापूर्वी आताय सांगता येणार नाही, असे मागत कडीसचे जम्मू-काश्मीरचे प्रमुख तारिक हमीद कर्रा यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत बोलायचे टाळले. कर्रा यांनी रविवारी पोटी मुलाखत दिली यावेळी बोलताना ते म्हणाले की, जाम-काश्मीरमध्ये होऊ घातलेली निवडक ही सरकार स्थापन करणे किंवा केश निवद्वणे यापुरतीच सीमित नाही, जम्मू-काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा मिळावा आणि राज्याच्या विधिमंडळाला ऑपकार मिळावेत त्याचप्रमाणी आमच्या राज्याला पुन्हा प्रतिष्ठा मिळावी यासाठी ही निवडणूक महानी आहे.

"आगामी विधानसभा निवडनुकीत जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सच्या आघाडीला पूर्ण बहुमतुति," असा विश्वास करो यांनी यावेळी व्यक्त केला, त्याचप्रमाणे मेहबुबा मुफ्ती पांच्या पक्षाला राज्यात फारसे यश मिळणार नाही, असा दावाही त्यांनी केला, "जम्मू-काश्मीरमध्ये भाजपची सत्ता येणार नसल्याचे त्यांना जाणवत असल्यानेच त्यांनी नायव राज्यपालांच्या अधिकारात वाढ केली आहे," असा दावाही करां यांनी केला.

'डीपीएपीला भवितव्य नाही'
गुलाम नबी आझाद यांच्या पक्षाबदल विचारले असता कर्रा म्हामले, "गुलाम नवी आइसद यांचा लोकशाहीवादी पुरोगामी आधराद पक्ष (डीपीएपी) हा संपलेले प्रकरण असून, त्यांना कोणतेही भवितव्य नाही. ते जे करत होते ते केवळ फूट पाडण्यासाठी सुरू होते आणि त्यात त्यांना अपयश आले आहे."

भाजपकडून १० उमेदवारांच्या नावांची घोषणा
जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने पक्षाची सहावी यादी जाहीर केली असून या यादीत दहा नावांचा समावेश आहे. यापैकी पाच उमेदवार मुस्लिम समाजातील आहेत. जम्मू काश्मीरमध्ये विधानसभेच्या एकूण ९० जागा असून यातील ४७ जागा काश्मीरमध्ये तर ४३ जागा जम्मूमध्ये आहेत, २०१४ पर्यंत विधानसभेचे एकूण संख्याबळ ८७ शाके होते. यातील ४६ जागा काश्मीरमध्ये तर ३० जागा जम्मूमध्ये होत्या. फगुआ मतदारसंघात भाजपने डॉ. नशा भूषण यांना उमेदवारी दिली असून विश्वाह मतदारसंघात राजीव भगत यांना तर बाहू मध्ये विक्रम रंधावा यांना संधी दिली आहे. याशिवाय मढ़ मतदारसंघात सुरिंदर भगत यांना मैदानात उतरविण्यात आलो आहे. त्याचप्रमाणे आर. एस. पठानिया (उबमपूर पूर्व), फकीर मो. खान (गुरेज), नसीर अहमद लोन (बांदीपोरा), अब्दुल रशीद खान (सोनावारी), गुलाम मी. पीर (हंदवाडा) आणि इदरीस करनाही (करनाह) यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter