सुनीता विल्यम्स यांनी अंतराळातून दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 d ago
अंतराळातून दिवाळीच्या शुभेच्छा देताना सुनीता विल्यम्स
अंतराळातून दिवाळीच्या शुभेच्छा देताना सुनीता विल्यम्स

 

नासामधील भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळस्थानकावरून (आयएसएस) व्हिडीओ संदेश जारी करत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी निमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांचा हा व्हिडीओ दाखवण्यात आला. या व्हिडीओत त्यांनी त्यांच्या वडिलांची आठवणही काढली. तसेच त्यांनी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरीस यांचे आभारही मानले. सुनीता विल्यम्स या दीर्घकाळापासून अंतराळात अडकल्या आहेत.

काय म्हणाल्या सुनीता विल्यम्स?
सुनीता यांनी म्हटले आहे की, "व्हाईट हाऊससह जगभर दिवाळी साजरी होते आहे. अंतराळ स्थानकावरून मी सर्वांना शुभेच्छा देते. यंदा मला पृथ्वीपासून २६० मैल दूर अंतराळात दिवाळी साजरी करण्याची संधी मिळाली आहे. भारतातून अमेरिकेत आलेल्या माझ्या वडिलांनी आम्हाला दिवाळीसह इतर सण साजरे करण्यास तसेच आपली सांस्कृतिक मूल्ये जपण्यास शिकवले. दिवाळी हा आनंदाचा क्षण आहे." या व्हिडिओत त्यांनी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांचे आभारही मानले आहेत.

पुढे बोलताना सुनीता यांनी व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी साजरी केल्याबद्दल राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांचे आभारही मानले. भारतीय समुदायाबरोबर दिवाळी साजरी केल्याबद्दल मी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांचे आभारही मानते, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.