वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम २०२५ दरम्यान, भाजप नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपले मत व्यक्त केले. महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक प्रगतीवर भारताचे मत मांडण्यासाठी पूर्व केंद्रीय मंत्री स्मृती ईरानी दावोसमध्ये उपस्थित होत्या. या आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्समध्ये जगभरातील प्रतिनिधी महिलांच्या भूमिकेबद्दल त्यांनी चर्चा केली.
दावोसमध्ये राहुल कंवल यांच्याशी संवाद साधताना स्मृती इराणी यांनी अलायन्स फॉर ग्लोबल गुडच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण आणि त्यांचा सहभाग वाढवण्यावर भर दिला. जगप्रसिद्ध संस्था एलायन्स फॉर ग्लोबल गूड्सच्या संस्थापक आणि अध्यक्ष म्हणून WEF मध्ये सहभागी होणाऱ्या स्मृती ईरानी यांनी महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक स्थितीला अजून कसे प्रभावी बनवता येईल यावर भारताची भूमिका त्यांनी मांडली.
दरम्यान, स्मृती ईरानी WEF मध्ये महिलांच्या समानता आणि विकासाच्या मुद्द्यावर जागतिक चर्चा करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. या फोरमच्या पहिल्या सत्रात स्मृती ईरानी शैक्षणिक सुधारणा, लैंगिक समानता आणि आर्थिक धोरणांसंबंधी आपली भूमिका मांडली. दुसऱ्या सत्रामध्ये सामाजिक बदल आणि लैंगिक समानता यावर चर्चा केली. तर, तिसऱ्या सत्रात महिला आणि बालकल्याण मंत्री म्हणून महिला पोषण सुधारणा क्षेत्राबद्दल चर्चा केली.
दावोस फोरममध्ये भारताच्या इतर प्रमुख नेत्यांमध्ये केंद्रीय मंत्री सी. आर. पाटील, जयंत चौधरी, अश्वनी वैष्णव, चिराग पासवान, राममोहन नायडू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही सहभागी झाले होते.