तेलंगणामध्ये सात नक्षलवाद्यांचा खातमा करण्यात आला. यात एका म्होरक्याचाही समावेश आहे. मुलुगू जिल्ह्यातील चलपाका जंगलात रविवारी पहाटे साडेपाच वाजता झालेल्या चकमकीत पोलिसांनी सात माओवाद्यांना ठार केले. मुलुगूचे पोलिस अधीक्षक डॉ. सबारिश यांनी ही माहिती दिली.
पोलिसांचे खबरे असल्याच्या संशयावरून गेल्या आठवड्यात दोन ग्रामस्थांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर माओवादी विरोधी ग्रेहाऊंड या पोलिसांच्या विशेष दलाने आज सकाळी चलपाका जंगालात शोध मोहिमेला सुरुवात केली. त्यावेळी तेथे माओवाद्यांचा गट आढळला. त्यांना शरण येण्याचे आदेश देण्यात आला.
पण माओवाद्यांनी पोलिसांच्या गोळीबार सुरू केला. पोलिसांनीही त्यांच्या प्रत्युत्तर देत सात माओवाद्यांना ठार केले. यात येलांदु-नरसमपेट विभागातील समिताचा म्होरक्या आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा (माओवादी) सदस्य बदरू ऊर्फ पापन्ना (वय ३५) याचा समावेश आहे. माओवाद्यांकडील ‘एके-४७’ ‘जी३’ ‘इनसास’ रायफल शिवाय इतर शस्त्रे आणि स्फोटके पोलिसांनी जप्त केली आहेत.
गुप्तचर विभागाला माहिती दिल्याचा आरोप
माओवाद्यांचा माग काढून त्यांचे पुनरुज्जीवन करण्याच्या मोहिमेत अलीकडच्या वर्षांत मुलुगूमध्ये माओवाद्यांबरोबर झालेली ही पहिली मोठी चकमक आहे. पोलिसांचे खबरे असल्याच्या संशयाने पेरुरु ग्रामपंचायतीचे सचिव उईका रमेश आणि उईका अर्जुन यांची २१ नोव्हेंबरला माओवाद्यांनी हत्या केली होती. त्यांच्या मृतदेहांच्या शेजारी एक चिठ्ठी लिहिलेली होती. हे खबरे माओवाद्यांची माहिती गोळा करून राज्याच्या गुप्तचर विभागाला पुरवित असल्याचा दावा त्यांनी चिठ्ठीत केला होता.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter