उत्तर प्रदेशातील संभळमधील जामा मस्जिदीचे सर्वेक्षण जवळपास पूर्ण पूर्ण झाले असून ते पुढील वर्षी जानेवारी महिन्यात सादर केले जाईल, अशी माहिती या प्रकाणाचा आढावा घेण्यासाठी न्यायालयाने नेमलेले वकील रमेशसिंह राघव यांनी दिली. दोन अथवा तीन जानेवारी रोजी याबाबतचा सर्वेक्षण अहवाल सादर करण्यात येईल, असे ते म्हणाले.
"संभळ येथील शाही जामा मस्जिदीच्या सर्वेक्षणाचा अहवाल जवळपास पूर्ण झाला आहे. काही तांत्रिक बाबींची पूर्तता राहिली आहे, जी लवकरच करण्यात येईल. या प्रकरणी सहा जानेवारीपर्यंत कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले असल्याने हा कालावधी संपायच्या आत हा अहवाल सादर करावा लागणार आहे," अशी माहिती राघव यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
संभळमधील मंदिर पाडून बावर याने जामा मस्जिद बांधली होती, असा दावा हिंदू पक्षाने केल्यानंतर स्थानिक न्यायालयाच्या वतीने या मस्जिदीच्या सर्वेक्षणाचे आदेश देण्यात आले होते. या सर्वेक्षणावर २४ नोव्हेंबर रोजी स्थानिकांनी आक्षेप नोंदविला. यावेळी उसळलेल्या दंगलीमध्ये चार जणांचा मृत्यू झाला. यानंतर २९ नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी कारवाईस स्थगिती दिली.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter