पाकिस्तानने व्याप्त काश्मीर मोकळा करावा - परराष्ट्रमंत्री जयशंकर

Story by  Bhakti Chalak | Published by  Bhakti Chalak • 6 h ago
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर

 

भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर सध्या यूके दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी लंडन येथे एका मुलाखतीवेळी काश्मीर प्रश्नावर मोठे वक्तव्य केले आहे. लंडनच्या थिंकटँक हाऊसमधील एका कार्यक्रमात त्यांना पाकिस्तानच्या एका पत्रकाराने काश्मीरबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी "पाकिस्तानने जर पीओकेवरील ताबा काढला तर काश्मीर प्रश्न सुटेल" असे म्हटले आहे.

पाकिस्तानी पत्रकाराला उत्तर देत असताना जयशंकर म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतचे संबंध वापरून काश्मीर समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू शकतात का, त्यावर एस जयशंकर यांनी एका वाक्यात उत्तर दिले. जर पाकिस्तानने काश्मीरातील एका भागावरील ताबा सोडला तर समस्याच राहणार नाही." 

यावेळी बोलताना एस. जयशंकर म्हणाले, “पाकिस्ताने बळकावलेला भारताचा भाग (पाकव्याप्त काश्मीर) परत भारताला मिळण्याची आम्ही वाट पाहतोय. तो हिस्सा भारताकडे परत आल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये शांतता निर्माण होईल. जम्मू-काश्मीरमध्ये शांतता निर्माण करण्यासाठी तीन टप्प्यांचा कार्यक्रम आखण्यात आला आहे. आम्ही त्यावर काम करत असून अर्ध्याहून अधिक काम पूर्ण झालं आहे.” 

भारत काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी काय उपाययोजना करत आहे, याविषयी बोलताना जयशंकर म्हणाले, “काश्मीरमध्ये शांतता निर्माण करण्याची प्रक्रिया तीन टप्प्यांमध्ये पार पडत आहे. पहिल्या टप्प्यात आम्हाला कलम ३७० हटवावं लागणार होतं. आम्ही पहिला टप्पा पूर्ण केला आहे. काश्मीरमध्ये शंतता निर्माण करण्यासाठीच आम्ही ते केलं. दुसऱ्या टप्प्यात काश्मीरमध्ये विकास व आर्थिक उलाढाल वाढवण्यासह सामाजिक न्याय बहाल करण्याची प्रक्रिया चालू आहे. तिसऱ्या टप्प्यात काश्मीरमध्ये मतदानाचं प्रमाण वाढवून लोकशाही अधिक बळकट करण्याचं काम केलं जात आहे. आम्ही नुकतीच जम्मू-काश्मीरमध्ये निवडणूक घेतली.”