पद्म पुरस्कारांसाठी 'इथून' करता येईल शिफारस

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pradnya Shinde • 1 Months ago
पद्म पुरस्कार
पद्म पुरस्कार

 

प्रजासत्ताक दिन २०२५ निमित्त घोषित करण्यात येणाऱ्या पद्म पुरस्कार २०२५ साठी नामांकन/शिफारशी सादर करायला १ मे २०२४ पासून सुरुवात झाली आहे. पद्म पुरस्कारांसाठी नामांकने दाखल करण्याची शेवटची तारीख १५ सप्टेंबर २०२४ आहे. पद्म पुरस्कारांसाठी नामांकने /शिफारशी  राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर ऑनलाइन (https://awards.gov.in) दाखल करता येतील .

पद्म पुरस्कार म्हणजेच पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री हे देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक आहेत. १९५४ मध्ये स्थापन झालेल्या या पुरस्कारांची घोषणा दरवर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त केली जाते. हा पुरस्कार 'अतुलनीय कार्याला ' विशेष ओळख प्रदान करण्याचा प्रयत्न असून  कला, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा, वैद्यक, सामाजिक कार्य, विज्ञान आणि अभियांत्रिकी, सार्वजनिक व्यवहार, नागरी सेवा, व्यापार आणि उद्योग यांसारख्या सर्व क्षेत्रे/विषयांमध्ये विशिष्ट आणि उल्लेखनीय कामगिरी/सेवेसाठी दिला जातो.  वंश, व्यवसाय, पद किंवा लिंग असा भेद न करता सर्व व्यक्ती या पुरस्कारांसाठी पात्र आहेत. डॉक्टर आणि वैज्ञानिक वगळता सार्वजनिक उपक्रमांसोबत काम करणारे सरकारी कर्मचारी पद्म पुरस्कारांसाठी पात्र नाहीत.

पद्म पुरस्कारांचे रूपांतर “जनतेचे पद्म” पुरस्कार यामध्ये करण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे. म्हणून, सर्व नागरिकांना विनंती करण्यात येत आहे की त्यांनी स्व-नामांकनासह इतरांचे नामांकन/शिफारशी देखील कराव्यात.

नामांकने /शिफारशींमध्ये उपरोक्त पोर्टलवर उपलब्ध असलेल्या नमुन्यात निर्दिष्ट सर्व संबंधित तपशील असावेत, ज्यात शिफारस केलेल्या व्यक्तीची संबंधित क्षेत्र /सेवेतील विशिष्ट आणि अतुलनीय  कामगिरी/सेवा वर्णनात्मक स्वरूपात (जास्तीत जास्त ८०० शब्द) स्पष्टपणे मांडलेली असावी.

या संदर्भातील तपशील गृह मंत्रालयाच्या संकेतस्थळावर (https://mha.gov.in) आणि पद्म पुरस्कार पोर्टलवर (https://padmaawards.gov.in)'पुरस्कार आणि पदके' या शीर्षकाखाली देखील उपलब्ध आहेत. या पुरस्कारांशी संबंधित कायदे आणि नियम https://padmaawards.gov.in/AboutAwards.aspx या लिंकसह संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
 
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter