राहुल गांधी यांनी दिला राजर्षी शाहू महाराजांच्या आदेशाचा दाखला

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 1 Months ago
छत्रपती शाहू महाराज,  राहुल गांधी
छत्रपती शाहू महाराज, राहुल गांधी

 

राजर्षी शाहू महाराजांच्या पाठिंब्याचा आणि प्रयत्नांचा प्रभाव घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर पडल्याने त्यांनी ‘संविधानात’ आरक्षणाचा समावेश केला.

राजर्षी शाहू महाराज यांनी २६ जुलै १९०२ रोजी समाजातील दुर्बल घटकांना नोकरीत आरक्षण देण्याचा निर्णय घेतला; त्याचा दाखला देत लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी आरक्षणाची पन्नास टक्के मर्यादा काढून टाकण्याची मागणी केली. या संदर्भात राहुल गांधी यांनी ‘एक्स’वर एक पोस्ट करीत ही मागणी लावून धरली आहे. त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे की, सामाजिक न्यायासाठी राजर्षी शाहू महाराजांचे योगदान त्यांच्या काळाच्याही खूप पुढे होते. देशातील सामाजिक न्यायाच्या लढ्यात ते अग्रणी होते. सामाजिक सुधारणांच्या त्यांच्या आजीवन कार्याचा माझ्यावरही मोठा प्रभाव पडला आहे.
 
राजर्षी शाहू महाराजांनी २६ जुलै १९०२ रोजी ‘करवीर संस्थानचे गॅझेट’ प्रकाशित करण्याचा निर्णय घेऊन शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण केले. त्याच दिवशी राजर्षी शाहू महाराज यांनी सरकारी नोकरीत समाजातील दुर्बल घटकांसाठी ५० टक्के आरक्षण देऊन या घटकांना बळ देण्याचे काम केले.

राजर्षी शाहू महाराजांच्या पाठिंब्याचा आणि प्रयत्नांचा प्रभाव घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर पडल्याने त्यांनी ‘संविधानात’ आरक्षणाचा समावेश केला. जातीय जनगणना करून आरक्षणातील ५० टक्के मर्यादा काढून टाकणे आणि उपेक्षितांसाठी न्याय, या आमच्या मागण्या राजर्षी शाहू महाराजांच्या क्रांतिकारी आदर्शांनी प्रेरित आहेत, असेही या पोस्टमध्ये म्हटले आहे.
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter