धार्मिक स्थळांवर विशेषतः मस्जिदीवर असणारे लाउडस्पीकर हा नेहमीच राजकारणाचा आणि राजकीय चर्चांचा भाग राहिला आहे. तीन वर्षांपूर्वी यांनी राज ठाकरे यांनी मस्जिदींवरील लाऊडस्पीकरवर आक्षेप घेत आंदोलन केले होते. या नंतर मुंबई हायकोर्टाने विविध धार्मिक आणि इतर संस्थांमध्ये लावलेले बेकायदेशीर लाउडस्पीकर हटवण्यासाठी दंडात्मक कारवाई केली होती.
नुकतेच कोर्टाने या कारवाईसंदर्भातील माहिती राज्यसरकारला विचारली आहे. मुख्य न्यायाधीश डी.के. उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या पीठाने ६ आठवड्यांच्या आत या मुद्द्यावर माहिती सादर करण्याचे आदेश राज्याच्या गृहविभाग आणि पोलिस महासंचालक (डीजीपी) यांना दिले आहेत.
डीजीपी कडून उत्तर मागितले
न्यायालयीन खंडपीठाने याचिकाकर्त्याच्या आरटीआयच्या उत्तराद्वारे एसीएस होम आणि डीजीपी यांना २,९४० बेकायदेशीर लाउडस्पीकरांवर घेतलेल्या कारवाईचा खुलासा करण्याचे सांगितले आहे. कोर्टात अवमानना संबंधित याचिकेवर सुनावणी चालू आहे. याचिकेत धार्मिक स्थळांवर बेकायदेशीरपणे लावलेले लाउडस्पीकर हटवण्यासाठी २०१६ मध्ये न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे पालन न केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मस्जिदांमधून लाउडस्पीकर हटवले जातील
मुंबईचा रहिवासी संतोष पचलग याने २०१४मध्ये पहिल्यांदा हाईकोर्टमध्ये याचिका दाखल केली होती. या याचिकेतून नवी मुंबईतील काही मस्जिदांमध्ये बेकायदेशीरपणे लावलेले लाउडस्पीकर हटवण्याचे आदेश देण्याची मागणी केली होती. कोर्टाच्या आदेशानंतरही बेकायदेशीर लावलेले लाउडस्पीकर हटवण्यासाठी कारवाई करण्यात आलेली नाही. कोर्टाच्या आदेशाचे पालन न झाल्याने संतोष पचलग याने पुन्हा एकदा कोर्टात धाव घेतली आहे. याच प्रकरणावर आता कोर्टाने डीजीपी कडून अहवाल मागितला आहे.
ऑल इंडिया उलेमा बोर्डाच्या राष्ट्रीय महासचिवांचे काय मत आहे?
कोर्टाच्या या आदेशानंतर ऑल इंडिया उलेमा बोर्डाचे राष्ट्रीय महासचिव अल्लामा बुनई हसनी यांनी सांगितले की, “नक्कीच समाजाने कायद्याचे पालन करणे आवश्यक आहे. कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी करणे देखील महत्त्वाचे आहे. कोणत्याही धार्मिक स्थळावर लावलेले लाउडस्पीकर हटवण्यासाठी मंदिर आणि मस्जिद समित्यांशी संवाद साधून त्यांना कायद्याच्या चौकटीत आणले पाहिजे. तसेच त्यांच्यावर कारवाई करत धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकरला हटवले पाहिजे.”
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter