सुशिक्षित तरुणांसाठी प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 2 d ago
पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

केंद्र सरकारने सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणींसाठी प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना सुरू केली आहे. या योजनेद्वारे तरुणांना इंटर्नशिपची संधी मिळणार आहे. यामुळे त्यांना कौशल्य प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. इच्छुक उमेदवारांनी ३१ मार्चपर्यंत अर्ज करावा, असे आवाहन विभागाच्या सहायक आयुक्त संगीता खंदारे यांनी केले आहे.

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेच्या दुसन्या फेरीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या तरुण-तरुणींना सुरवातीला पोजनेचा वेबसाइटवर स्वतःचे प्रोफाइल तयार करावे लागणार आहे. त्यानंतर त्यांना इंटर्नशिपसाठी अर्ज करता येणार आहे. उमेदवार अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत सीन इंटर्नशिपसाठी अर्ज करू शकतात. योजनेच्या अंतर्गत युवकांना १२ महिन्यांसाठी इंटर्नशिप मिळणार आहे. या सोफ्तन स्पांना दरमहा पाच हजार रुपयांचे विद्यावेतन मिळणार आहे. तसेच इंटर्नशिप पूर्ण झाल्यानंतर सहा हजार रुपये एकरकमी अनुदान देखील त्या तरुण-तरुणींना दिले जाणार आहेत. याशिवाय भारत सरकारकडून प्रत्येक प्रशिक्षणार्थीला प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री मुरक्षा विमा योजनेअंतर्गत विमा संरक्षण देखील असणार आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तरुणांना http://pminternship.mca.gov.in या संकेतस्थळावर जाऊन त्वरित नोंदणी करावी लागणार आहे.

योजनेचे फायदे
  • १२ महिने इंटर्नशिपची संधी
  • दरमहा ५,००० रुपये विद्यावेतन
  • इंटर्नशिप पूर्ण झाल्यावर ६,००० रुपये एकरकमी अनुदान
  • प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत विमा संरक्षण

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना
राज्य सरकारनेही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली आहे. १८ ते ३५ वयोगटातील तरुण-तरुणींसाठी ही योजना असून, त्यानुसार –
  • बारावी उत्तीर्ण उमेदवारांना – ६,००० रुपये महिना
  • आयटीआय किंवा डिप्लोमा धारकांना – ८,००० रुपये महिना
  • पदवीधर व पदव्युत्तर उमेदवारांना – १०,००० रुपये महिना (६ महिने)

या योजनेमुळे तरुणांना आर्थिक मदत मिळते. मात्र, केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेमुळे राज्य सरकारची ही योजना सुरू राहील की बंद होईल, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेत काय 
  • देशातील १२ नामांकित कंपन्यांमध्ये १२ महिने नोकरीपूर्व प्रशिक्षणाची संधी
  • २१ ते २४ वयोगटातील तरुणांना लाभ
  • पूर्णवेळ शिक्षण, कौशल्य विकास किंवा नोकरीत नसलेल्या युवकांनाच संधी
  • दरमहा ५,००० रुपये आर्थिक सहाय्यता आणि ६,००० रुपये एकरकमी मदत

    'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

    Awaz Marathi WhatsApp Group 
    Awaz Marathi Facebook Page

    Awaz Marathi Twitter