पंतप्रधान मोदी जाणार रशियाच्या दोन दिवसीय दौऱ्यावर

Story by  Fazal Pathan | Published by  Fazal Pathan • 10 d ago
प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी जुलै महिन्यात दोन दिवसीय रशिया दौऱ्यावर जाणार आहेत. वार्षिक शिखर परिषदेच्या अनुषंगाने हा दौरा असल्याचे म्हंटले जात आहे. अद्याप भारतीय अधिकाऱ्यांकडून पंतप्रधानांच्या या संभाव्य दौऱ्याबद्दल काहीही माहिती देण्यात आलेली नाही. परंतु रशियाच्या राष्ट्राध्यक्षांचे सहाय्यक युरी उशाकोव्ह म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या  रशिया दौऱ्याची तयारी सुरू आहे. आम्ही अद्याप तारीख सांगू शकत नाही.”

नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर आणि रशिया युक्रेन युद्ध सुरू झाल्यानानंतर हा त्यांचा पाहिल्याच रशिया दौरा असेल. पंतप्रधानांनी शेवटचा रशिया दौरा हा २०१९ मध्ये केला होता. या दौऱ्याच्या निमित्ताने दोन्ही देशांचे संबंध, रशिया-युक्रेन युद्ध यांसह अनेक मुद्यांवर चर्चा केली जाऊ शकते. या दौऱ्यातून के सध्या होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  


द्विपक्षीय बैठक : 
द्विपक्षीय बैठकांच्या मध्यमातून दोन देशांमध्ये किंवा दोन दलांमध्ये विविध विषयांवर चर्चा केली जाते. तसेच काही करारही केले जातात.  

शिखर परिषद :
शिखर परिषदांमध्ये विविध देशांचे प्रतिनिधित्व करणारे राष्ट्रपति आणि पंतप्रधान भाग घेतात. याला आपण राज्य प्रमुखांची बैठक देखील म्हणू शकतो. 

या शिखर परिषदेला १९ व्या शतकात सुरुवात झाली. आंतरराष्ट्रीय राजकारण, दोन देशांतील तणाव कमी करण्यासाठी, संबंध प्रस्थापित करण्यासाठी या बैठका महत्वाच्या ठरतात. भारत आणि रशिया यांच्यामध्ये २००० मध्ये शिखर परिषदेला सुरुवात झाली. आतापर्यंत दोन्ही देशात २१ शिखर परिषद झाल्या आहेत.


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter