प्रधानमंत्री मोदींचे फ्रान्समध्ये 'असे' झाले जंगी स्वागत

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 9 h ago
फ्रांसमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्वागत
फ्रांसमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्वागत

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स आणि अमेरिका या दोन्ही देशांच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर रवाना झाले होते.  ते सोमवारी फ्रान्समध्ये दाखल झाले. तिथे त्यांनी ‘एआय ॲक्शन समिट’मध्ये भाग घेतला. १० ते १२ फेब्रुवारी दरम्यान फ्रांसमध्ये राहतील आणि १२ फेब्रीवारीला ते अमेरिकेसाठी रवाना होतील. अमेरिकेत ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतील. 

याविषयी पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर लिहले, “ विविध कार्यक्रमांमध्ये भाग घेण्यासाठी मी पुढील काही दिवस फ्रान्स आणि यूएसएमध्ये आहे. भारत-फ्रान्स संबंध मजबूत करण्यासाठी मी फ्रांसचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी चर्चा करणार आहे.” 
 

पुढे त्यांनी लिहले, “मी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष माझे मित्र डोनाल्ड ट्रम्प यांना भेटण्यासाठी उत्सुक आहे. या  भेटीमुळे भारत-अमेरिका यांच्यातील संबंध आणखी दृढ होतील. 

फ्रान्समध्ये पंतप्रधान मोदींची भेट आणि एआय समिट
फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदींनी फ्रान्सला भेट दिली आहे. पंतप्रधान मोदी या दौऱ्यात फ्रान्समध्ये २०२५ च्या एआय समिटमध्ये सह-अध्यक्षपद भूषवले. याठिकाणी त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय)च्या वापराबद्दल चर्चा केली. याशिवाय, मार्सिएले शहरात पंतप्रधान मोदी आणि मॅक्रॉन यांच्या हस्ते भारताचे पहिले वाणिज्य दूतावासाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. 

संरक्षण, अणुऊर्जा आणि अवकाश क्षेत्रात फ्रान्स आणि भारताचे संबंध मजबूत आहेत. १९७४ मध्ये भारताने फ्रान्सच्या मदतीने पहिली अणुचाचणी केली होती. २०२३ मध्ये दोन्ही देशांनी एकत्रित लष्करी सराव सुरु केला होता. पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्यात फ्रान्समधील संरक्षण करार, राफेल विमान आणि स्कॉर्पिन पाणबुड्यांच्या खरेदीसंबंधी महत्त्वाच्या करारावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

फ्रांसमध्ये मोदींचे स्वागत 
फ्रांसमध्ये पोहचल्यानंतर प्रधानमंत्री मोदी यांचे तेथील नागरिकांनी जोरदार स्वागत केले. फ्रान्समध्ये मोदींना पाहून तेथील भारतीयांनी पारंपरिक पद्धतीने त्यांचे स्वागत केल्याचे पाहायला मिळाले. मोदी यांनी 'एक्स'वर स्वागताचे फोटो पोस्ट करताना लिहले, “पेरिसमध्ये अद्भुत स्वागत! थंड हवामान असूनही भारतीय समुदायाने आपले स्नेह दाखवले आहे. आम्ही या समुदाया बद्दल कृतज्ञ आहोत. तसेच आम्हाला त्यांच्या सिद्धिवर, त्यांच्या कामगिरीवर गर्व आहे.” 

A memorable welcome in Paris!

The cold weather didn’t deter the Indian community from showing their affection this evening. Grateful to our diaspora and proud of them for their accomplishments! pic.twitter.com/rrNuHRzYmU

— Narendra Modi (@narendramodi) February 10, 2025
 
 पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ट्रम्प यांची भेट 
पंतप्रधान मोदी फ्रांस दौरा आटोपल्यानंतर अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी दोन्ही देशांमधील संरक्षण, व्यापार आणि आर्थिक संबंध बळकट करण्यासाठी चर्चा करतील. 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय स्टील आणि अॅल्युमिनियमवर २५ टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे भारताच्या उद्योगांवर दबाव वाढणार आहे. पंतप्रधान मोदी या दौऱ्यात या टॅरिफमध्ये कपात करण्याचा मुद्दा उपस्थित करू शकतात. तसेच ऊर्जा आणि संरक्षण आयात वाढवण्यासंदर्भातही चर्चा होऊ शकते.

ट्रम्प सरकारने व्यापार युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतासमोर आव्हान उभे केले असताना मोदी यांचा हा दौरा दोन्ही राष्ट्रांच्या संबंधांच्या भविष्याबाबत महत्त्वपूर्ण ठरतो.

आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताचे स्थान
पंतप्रधान मोदींच्या फ्रान्स आणि अमेरिका दौऱ्याचा उद्देश भारताचे आंतरराष्ट्रीय स्थान अधिक मजबूत करणे आहे. फ्रान्स आणि भारत यांच्यातील द्विपक्षीय भागीदारी आणखी मजबूत करण्यावर भर देण्यात येईल. तसेच भारतासोबत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत कायमस्वरूपी सदस्यपद मिळवण्यावर देखील या दौऱ्यात चर्चा केली जाऊ शकते.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter