संसदेतील भाषणात पंतप्रधान मोदींनी मांडले 'हे' दहा मुद्दे

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 2 d ago
प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र

 

संसदेच पावसाळी अधिवेशन सुरू असुन विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी विविध मुद्यांवर सत्ताधाऱ्यांवर  प्रश्न विचारले. भाजप हा हिंदू समाज नाही, नरेंद्र मोदी म्हणजे हिंदू समाज नाही, आरएसएस म्हणजे संपूर्ण हिंदू समाज नाही अस म्हणत राहुल गांधी यांनी भाजपावर टीका केली. यावेळी एकच गोंधळ पाहायला मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर बोलताना विरोधी पक्षांवर हल्लाबोल केला.  यावेळी त्यांनी राहुल गांधी यांचा बालकबुद्धी म्हणून उल्लेख केला. दरम्यान, संसदेतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील १० ठळक मुद्दे जाणून घेऊ...

  • कलम ३७० च्या काळात लष्करावर दगडफेक झाली आणि निराशेचे वातावरण निर्माण झाले. आज कलम ३७० रद्द केल्यानंतर दगडफेक थांबली आहे. लोक भारताची राज्यघटना, ध्वज आणि लोकशाहीवर विश्वास ठेवून निवडणुकीत भाग घेत आहेत.
  • विरोधकांवर तोंडसुख घेत ते म्हणाले, काँग्रेस आणि तिची परिसंस्था लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न करत आहेत की, त्यांनी आमचा पराभव केला आहे.
  • काँग्रेसवर टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, सतत खोटे बोलूनही निवडणुकीत पराभूत झालेल्या काही लोकांची व्यथा मी समजू शकतो. भारतीय जनतेने त्यांना सलग तिसऱ्यांदा सेवेची संधी दिली आहे.
  • देशाच्या इतिहासातील ही अत्यंत महत्त्वाची घटना आहे. जनतेने आमचा १० वर्षांचा ट्रॅक रेकॉर्ड पाहिला आहे. देशाने तुष्टीकरणाचे राजकारण आणि प्रशासनाचे मॉडेल दीर्घकाळ पाहिले आहे.
  • भ्रष्टाचाराविरुद्धच्या आमच्या लढ्यात, आम्हाला जनतेचा भक्कम पाठिंबा मिळाला आहे, जो पूर्णपणे 'इंडिया फर्स्ट' तत्त्वावर आधारित आहे.
  • मी आपल्या देशवासियांना आश्वासन देऊ इच्छितो की, विकसित भारत घडवण्याचा आमचा संकल्प पूर्ण करण्यात आम्ही कोणतीही कमतरता सोडणार नाही. आम्ही सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू.
  • २०१४ मध्ये देश नैराश्यात होते, लोकांनी आम्हाला निवडून दिले आणि परिवर्तनाचे युग सुरू झाले.
  • भ्रष्टाचाराचा एक काळ असा होता की, दिल्लीतून पाठवलेल्या एक रुपयापैकी फक्त १५ पैसेच त्याच्या गंतव्यस्थानी पोहोचल्याचे उघडपणे मान्य करण्यात आले होते. उर्वरित ८५ पैसे घोटाळ्यात गेले.
  • देशातील जनतेने २०२४ च्या निवडणुकीत काँग्रेसला जनादेश दिला आहे, तुम्ही तिथे बसा, विरोधी पक्षात बसा आणि तर्क संपले की ओरडत राहा.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter