'या' दिवशी पंतप्रधान आणि गृहमंत्री कुंभमेळ्यात होणार सहभागी

Story by  Fazal Pathan | Published by  Fazal Pathan • 5 h ago
राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड़, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह
राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड़, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह

 

प्रयागराजमध्ये तब्बल या १४४ वर्षानंतर महाकुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी असे ४५ दिवस हा महाकुंभमेळा चालणार आहे. ४५ दिवस चालणाऱ्या या कुंभमेळ्यात सुरुवातीपासूनच लाखो भाविक सहभागी होत आहे. आता येणाऱ्या काही दिवसात देशाच्या राष्ट्रपती, उपराष्ट्रपतींसह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री शाहदेखील कुंभात सहभागी होणार आहेत. 

देशाचे गृहमंत्री अमित शाह हे अनुक्रमे २७ जानेवारीला महाकुंभमेळ्यात सहभागी होणार आहेत. यासंदर्भातील त्याचा दौरा देखील प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामध्ये संगम स्नान, गंगा पूजन केल्यानंतर प्रयागराजमध्ये ते अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतील असा समावेश करण्यात आला आहे. 

गृहमंत्री अमित शाह यांच्यानंतर ५ फेब्रुवारीला देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तर १० फेब्रुवारीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू कुंभमेळ्यात सहभागी होणार आहेत. या दोन्ही नेत्यांच्या आगमनाच्या दृष्टीने प्रयागराजमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात येत आहे. 

आतापर्यंत लाखो भाविकांनी कुंभात सहभाग घेतला आहे. परंतु येत्या दिवसात आणखी भाविक कुंभमेळ्याला भेट देण्याची शक्यता आहे. त्यामुळे याठिकाणची गर्दीदेखील वाढणार आहे. पुढील काही दिवसातील शाही स्नान भाविकांच्या गर्दीचे करण ठरू शकते. 

योगींनी घेतली अधिकाऱ्यांची बैठक 
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी सुरक्षेच्या अनुषंगाने अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. तत्पूर्वी योगींनी हेलिकॉप्टरमधून संपूर्ण महाकुंभाची पाहणी केली होती. या बैठकीतून त्यांनी  अधिकाऱ्यांना पुढील व्यवस्थापणाचे निर्देश दिले. यावेळी योगी म्हणतात, "आगामी काही दिवसांत राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि गृहमंत्री यांचे प्रयागराजमध्ये आगमन होणार आहे. २२ जानेवारीला राज्य मंत्रिमंडळाची बैठकही येथे होईल. या संदर्भात सर्व आवश्यक तयारी वेळेवर कराव्यात."

पुढे ते म्हणाले, "मौनी अमावस्या आणि वसंत पंचमीच्या प्रसंगी अमृत स्नानासाठी सुरक्षा व्यवस्था मजबूत करावी. गर्दीला नियंत्रित करण्याच्या दृष्टिकोनातून या विशेष दिवशी पांटून पूलावर एकतर्फी वाहतूक ठेवली जाईल."

शाही स्नान आणि तारखा 
२९ जानेवारी मौनी अमावस्सेच्या दिवशी दुसरे शाही स्नान पार पडणार आहे. तर ३ फेब्रुवारी वसंत पंचमीच्या दिवशी तिसरे शाही स्नान पार पडेल. १२ फेब्रुवारी म्हणजे माघी पौर्णिमेला चौथे आणि २६ फेब्रुवारी महाशिवरात्रीच्या दिवशी पाचवे शाही स्नान होणार आहे. उत्तर प्रदेश सरकारने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार त्रिवेणी संगमात २० जानेवारीपर्यंत ८८.०१ लाख भानिकांनी स्नान केलं आहे.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter