दहशतवादाला पाठीशी घालणाऱ्यांना उघडे पाडा - पंतप्रधान मोदी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 3 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

कझाकस्तान येथे आयोजित शांघाय सहकारी संघटना (एससीओ) शिखर परिषदेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व परराष्ट्र मंत्री डॉ.एस जयशंकर यांनी केले. राष्ट्र प्रमुखांच्या या शिखर परिषदेत त्यांनी यावेळी पंतप्रधान मोदी यांचा संदेश वाचून दाखला. 

यावेळी पंतप्रधानांनी जागतिक दहशतवादावर भाष्य केले. ते म्हणाले, "पल्यापैकी अनेकांसाठी दहशतवाद हा निश्चितपणे अग्रस्थानी असेल. सत्य हे आहे, की काही देश, त्याचा वापर अस्थिरता निर्माण करणारे साधन म्हणून करत आहेत. आपण सर्वांनी सीमेपलीकडचा दहशतवाद अनुभवला आहे."

आपल्या संदेशात ते पुढे म्हणाले, "कोणत्याही  स्वरूपातील दहशतवादाचे समर्थन करता येणार नाही, आणि त्याला माफही करता येणार नाही. दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्यांचा सर्वांनी तीव्र निषेध करायला हवा. सीमापार दहशतवादाला निर्णायक प्रतिसाद आवश्यक आहे आणि दहशतवादाला वित्तपुरवठा आणि दहशतवाद्यांच्या भरतीचा प्रभावीपणे सामना करणे आवश्यक आहे. एससीओ ने कधीही आपल्या वचनबद्धतेपासून फारकत घेता कामा नाही. याबाबत आपण दुटप्पी मापदंड बाळगू शकत नाही."

या संदेशात त्यांनी भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील संबंधांवरही भाष्य केले. ते म्हणाले, "अफगाणिस्तानचा मुद्दा मी मांडत आहे. अफगाणिस्तानातील जनतेसह आमचे ऐतिहासिक नातेसंबंध आहेत. आमच्या सहकार्याची व्याप्ती विकास प्रकल्प, मानवतावादी सहाय्य, क्षमता बांधणी आणि क्रीडा क्षेत्रात आहे. अफगाणी जनतेच्या गरजा आणि आकांक्षांप्रती भारत संवेदनशील आहे."