पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच दावुदी बोहरा समाजाच्या एका शिष्टमंडळाशी त्यांच्या लोक कल्याण मार्गावरील निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत समाजातील व्यावसायिक, डॉक्टर, शिक्षक आणि इतर प्रमुख व्यक्तींनी वक्फ कायद्यामुळे यापूर्वी झालेल्या त्रासांच्या कहाण्या सांगितल्या आणि वक्फ दुरुस्ती कायद्यासाठी पंतप्रधानांचे आभार मानले. हा कायदा त्यांच्या दीर्घकाळापासून प्रलंबित मागणीचा भाग होता, असे त्यांनी सांगितले.
या भेटीविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, दावुदी बोहरा समाजाच्या लोकांशी खूप छान भेट झाली! आम्ही बर्याच वेगवेगळ्या गोष्टींवर बोललो.”
दावुदी बोहरा समाजाच्या सदस्यांनी सांगितले की, “यापूर्वी वक्फ बोर्डाकडून त्यांच्या मालमत्तांवर चुकीच्या पद्धतीने दावा केला जात होता. यामुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. विशेषतः महिलांना, त्यातही विधवांना याचा सर्वाधिक फटका बसत होता. या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी पंतप्रधानांनी वक्फ दुरुस्ती कायदा आणला, यामुळे समाजाला मोठा दिलासा मिळाला आहे. शिष्टमंडळाने या कायद्याला केवळ अल्पसंख्याकांसाठीच नव्हे, तर अल्पसंख्याकांमधील उपेक्षित घटकांसाठीही महत्त्वाचा ठरवला आहे.”
दावुदी बोहरा समाजाने पंतप्रधानांच्या नेतृत्वाचे कौतुक केले आणि त्यांच्या 'सबका साथ, सबका विकास' या संकल्पनेवर पूर्ण विश्वास व्यक्त केला. भारताने नेहमीच त्यांच्या सांस्कृतिक ओळखीला प्रोत्साहन दिले आहे, असे त्यांनी सांगितले. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली त्यांना खऱ्या अर्थाने समावेशकतेची भावना जाणवते, असे समाजाचे म्हणणे आहे. यावेळी त्यांनी 'विकसित भारत 2047' या पंतप्रधानांच्या स्वप्नाला पूर्ण पाठिंबा दर्शवला आणि या प्रवासात सर्वतोपरी सहभाग देण्याची तयारी दाखवली.
महिलांचे सक्षमीकरण आणि समाजकल्याण
पंतप्रधानांनी या कायद्यामागील प्रेरणा आणि त्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल सांगितले. ते म्हणाले, "वक्फ कायद्यामुळे सर्वसामान्यांना खूप त्रास सहन करावा लागत होता. विशेषतः महिलांना, त्यातही विधवांना याचा जास्त त्रास होत होता. हा कायदा आणण्यामागील एक प्रमुख कारण म्हणजे या समस्यांचे निराकरण करणे."
त्यांनी 'बेटी बचाओ, बेटी पढाओ', 'आत्मनिर्भर भारत' आणि लघु-मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देणाऱ्या योजनांचेही कौतुक केले. या योजनांचा विशेषतः लहान व्यावसायिकांना खूप फायदा झाला आहे, असे शिष्टमंडळाने नमूद केले.
पंतप्रधानांनी दावुदी बोहरा समाजाशी असलेल्या त्यांच्या दीर्घकालीन नात्याचा उल्लेख केला. समाजाच्या सामाजिक कार्याच्या परंपरेचे त्यांनी कौतुक केले. या कायद्याच्या निर्मितीत समाजाचेही मोलाचे योगदान आहे. पंतप्रधानांनी सांगितले की, “हा कायदा तयार करताना त्यांनी सर्वप्रथम दावुदी बोहरा समाजाचे धर्मगुरू सय्यदना मुफद्दल सैफुद्दीन यांच्याशी चर्चा केली होती. सय्यदना यांनी कायद्याच्या तपशीलांवर महत्त्वपूर्ण सूचना दिल्या, यामुळे हा कायदा अधिक प्रभावी बनला.”
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter