दिल्ली विधानसभा निवडणूकीसाठी काल ,आतडण पार पडले. दिल्लीतील ७० जागांसाठी हे मतदान झाले. या ७० जागांवर ६९९ उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीत १३, ७६६ मतदान केंद्रे होती. या मतदान केंद्रावर सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान घेण्यात आले. येत्या ८ फेब्रुवारीला दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकल लागणार आहे.
दिल्लीच्या मुस्तफाबाद मंतदारसंघात सर्वाधिक मतदान, तर करोल बागमध्ये सर्वात कमी मतदान झाले आहे. मुस्तफाबाद मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ६६. ६८ टक्के मतदान झाले. तर करोल बागमध्ये सर्वात कमी ४७.४० टक्के मतदान झाले. तर दिल्लीतील विधनसभा निवडणुकीत एकूण ६०.४४ टक्के मतदान झाले. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार दिल्लीतील उत्तर-पूर्व जिल्ह्यात सर्वाधिक ६६.२५ टक्के मतदान झाले. तर दक्षिण-पूर्वी जिल्ह्यात सर्वात कमी ५६.१६ टक्के मतदान झाले.
मतदानाची टक्केवारी
-
मुस्तफाबाद: ६९ टक्के मतदान
-
महरौली: ५३.०४ टक्के मतदान
-
शाहदरा: ६३.९४ टक्के मतदान
-
दक्षिण-पश्चिम दिल्ली: ६१.०९ टक्के मतदान
-
उत्तर-पश्चिम दिल्ली: ६०.७० टक्के मतदान
-
उत्तर दिल्ली: ५९.५५ टक्के मतदान
-
मध्य दिल्ली: ५९.०९ टक्के मतदान
-
दक्षिण-पूर्व दिल्ली: ५६.२६ टक्के मतदान
दिल्लीतील आपचे प्रमुख उमेदवार
नवी दिल्ली येथून दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, भाजपचे प्रेवेश वर्मा आणि कॉँग्रेसचे संदीप दीक्षित यांच्यात प्रमुख लढत होत आहे. या मतदारसंघात एकूण ५६.४१ टक्के मतदान झाले आहे.
तर कालकाजी मतदारसंघातून आम आदमी पक्षाच्या आतिशी निवडणूक लढवत आहेत. जंगपुरा मतदारसंघातून माजी उपमुख्यमंत्री आणि शिक्षा मंत्री मनीष सिसोदिया निवडणूक लढवत आहेत. तसेच पटपडगंज या मतदारसंघातून अवध ओझा हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
२०२० मध्ये मतदानाचा आकडा:
२०२० च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत ६२.५९ टक्के मतदान झाले होते. त्यावेळी अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आपने ७० पैकी ६२ जागांवर विजय मिळवला होता. तर भाजपला ८ जागांवर विजय मिळाला होता.
एग्जिट पोल्स:
-
मॅट्रीझ या संस्थेने दिलेल्या एक्झिट पोलनुसार आपला ३२-३७ जागा, भाजपला ३५-४० जागा तर काँग्रेसला ०-१ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे.
-
चाणक्य स्ट्रॅटेजी या संस्थेने केलेल्या एक्झिट पोलनुसार दिल्लीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल. या निवडणुकीत आम आदमी पक्षाला २५-२८ जागा, भाजपला ३९-४४ जागा आणि काँग्रेसला २-३ जागा मिळतील असे सांगितले आहे.
-
पी मार्क या संस्थेच्या एक्झिट पोलनुसार आम आदमी पक्षाला २१-३१ , भाजपला ३९-४९ आणि काँग्रेसला १ जागा मिळेल असा अंदाज आहे.
-
पीपल्स इन्साईट या संस्थेने आम आदमी पक्षाला २५-२९ , भाजपला ४०-४४ आणि काँग्रेसला ०-२ एवढ्या जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे.
-
पोल डायरी या संस्थेच्या एक्झिट पोलनुसार आपला १८-२५, भाजपला ४२-५० आणि काँग्रेसला ०-२ एवढ्या जागा मिळतील.
-
पीपल्स पल्सच्या अंदाजानुसार भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल. या निवडणुकीत आम आदमी पक्षाचे १०-१९, भाजपचे ५१-६० आणि काँग्रेसचा एकही आमदार निवडून येणार नाही असा अंदाज वर्तवला आहे.
-
वी प्रिसाईड या एक्झिट पोलने मात्र वेगळा अंदाज वर्तवला असून त्यांच्या आकडेवारीनुसार आम आदमी पक्ष पुन्हा एकदा सत्तेत येऊ शकतो. या एक्झिट पोलनुसार आम आदमी पक्षाला ४६-५२ ,भाजपला १८-२३ आणि काँग्रेसला ०-१ जागा दिल्या आहेत.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter