जम्मू-काश्‍मीरमधील दहशतवादी हल्ल्यांमध्ये पाकचा सहभाग?

Story by  Fazal Pathan | Published by  Fazal Pathan • 14 d ago
प्राथनिधिक चित्र
प्राथनिधिक चित्र

 

मागील काही दिवसांपासून जम्मू काश्मीरमध्ये सातत्याने दहशतवादी हल्ले होताना दिसत आहे. या हल्ल्यांना तेवढ्यात ताकदीने आपले भारतीय सैन्य देखील प्रतिउत्तर देत आहे. त्यामुळे सुरक्षा दल हाय अलर्टवर आले आहे. नुकत्याच झालेल्या चकमकीनंतर सुरक्षा दलाने केलेल्या सर्च ऑपरेशनमध्ये दहशतवाद्यांकडे ‘अल्ट्रा सेट’ आढळले. ते चीनी बनावटीचे असून त्यामध्ये उच्च तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे. पाकिस्तानी सैन्य याच प्रकारची उपकरणे वापरत असते. त्यामुळे आता पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवाद्यांचे संबंध उघड झाल्याचे बोलले जात आहे.

पाकिस्तानी दहशवाद्यांकडून हस्तगत केलेल्या ‘अल्ट्रा सेट’ची तपासणी सुरक्षा दलांनी केली. यातून पाकिस्तानी सैन्य दहशतवाद्यांना हँडसेट, प्रशिक्षण आणि दारूगोळा अशा शस्त्रांची मदत होत असल्याचे भारतीय सैन्य अधिकाऱ्यांनी सांगितले. हस्तगत करण्यात आलेले मोबाईल हँडसेट हे चीनमधील टेलिकॉम कंपन्यांनी पाकिस्तानी सैन्यासाठी तयार केले आहेत. मागील वर्षी जुलैमध्ये पूँच येथे झालेल्या चकमकीनंतर असे काही हँडसेट जवानांच्या हाती लागले होते.

चीन-पाकिस्तानची हातमिळवणी; दहशतवाद्यांना दुजोरा
आंतरराष्ट्रीय स्तरावर चीन आणि पाकिस्तानचे संबंध आपण जाणून आहोत. चीनने पाकिस्तानला विविध मार्गांनी मदत केली आहे करत आहे. पोलादी झाकण असलेले बंकर, ड्रोनचा पुरवठा, उच्च तंत्रज्ञान असलेले मनोरे, भूमिगत फायबर केबलचे जाळे, अनेक पायाभूत सुविधांची उभारणी यांचा समावेश आहे. चीन आणि पाकिस्तानमध्ये मजबूत लष्करी संबंध आहेत. अलीकडच्या काळात पाकिस्तान आणि चीन यांच्यात सुरू असलेल्या लष्करी प्रकल्प आणि करारांमुळे हे संबंध दृढ होत असल्याचे म्हंटले जात आहे.

‘अल्ट्रा सेट’ म्हणजे काय?
‘अल्ट्रा सेट’ हँडसेटचा वापर नेहमीच्या मोबाईल हँडसेटप्रमाणे करता येतो. मात्र त्याबरोबरच, ‘ग्लोबल सिस्टीम फॉर मोबाईल’ (जीएसएम) किंवा कोड-डिव्हिजन मल्टिपल ॲक्सेस (सीडीएमए) या सहसा वापरल्या जाणाऱ्या मोबाईल तंत्रज्ञानावर अवलंबून न राहता त्यामध्ये विशेष रेडिओ क्षमताही त्यामध्ये असते. हे यंत्र संदेशवहनासाठी रेडिओ तरंगांचा वापर करते. प्रत्येक यंत्र हे पाकिस्तानमधील एका नियंत्रण कक्षाशी जोडले गेले असल्याचे आढळून आले आहे. विशेष म्हणजे, चिनी उपग्रहांच्या माध्यमातून संदेशाची देवाणघेवाण होते.


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

 

Awaz Marathi Twitter