सर्वकाही ऑनलाइन उपलब्ध असल्याने बऱ्याच प्रक्रिया सोप्या झाल्या आहेत. आता आपण फोन किंवा लॅपटॉपच्या मदतीने बरीच कामे घरबसल्या करू शकतो. शासकीय कामागाजासाठी आधी महत्वाची कागदपत्रे कार्यालयात जाऊनच जमा करावी लागे. मात्र आता डिजीटलायझेशनमुळे ही प्रक्रिया सोपी झाली आहे. आज आपण मतदान ओळखपत्र घरच्या घरी कसे काढायचे ते जाणून घेऊया.
ऑनलाइन मतदान ओळखपत्र घरी बनवण्याची प्रक्रिया
ऑनलाइन मतदान ओळखपत्र बनवण्यासाठी सगळ्यात आधी इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया (Election Commission Of India) च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
आता Apply online for registration of new voter वर क्लिक करा.
नंतर डिस्प्लेवर दिसणारा फॉर्म भरावा, तसेच सोबत मागितलेले कागदपत्र अटॅच करा.
फॉर्म भरल्यानंतर Submit बटणावर क्लिक करा.
पुढील प्रक्रिया
तुम्ही ऑनलाइन फॉर्म सबमिट करताच तुमच्या मेल आयडीवर एक मेल येईल. मेलमध्ये तुम्हाला शासनाकडून एक लिंक पाठवली जाईल. तुम्ही याद्वारे तुमच्या मतदान ओळखपत्राचं स्टेटससुद्धा ट्रॅक करू शकता.
मतदान ओळखपत्र कधी मिळेल?
मतदान ओळखपत्रासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सोपी आहे. मात्र हे तयार होण्यासाठी थोडा वेळ लागतो. मतदान ओळखपत्रासाठी तुम्हाला १० ते १२ दिवस किंवा १ महिनासुद्धा लागू शकतो.