आता मतदारच खरा राजा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pradnya Shinde • 2 d ago
Maharashtra election
Maharashtra election

 

गेले पंधरा दिवस राज्यभर उडालेला प्रचाराचा धुरळा आज सायंकाळी सहा वाजता खाली बसला. जाहीर सभांतून होणारे आरोप- प्रत्यारोपांचे वार थांबले असून, या लढाईचा फैसला थेट जनतेच्याच दरबारात होईल. राज्यातील मतदारराजाला प्रतिनिधी निवडण्याची पुन्हा संधी मिळाली आहे. आपला मताधिकाराचा वापर करून 'तो' पुन्हा एकदा आपल्या एका मताची ताकद दाखवून देण्यासाठी सज्ज झाला आहे. आम्ही भारताचे लोक खरे राज्यकर्ते आहोत! हे तो ठणकावून सांगणार आहे. कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता बुधवारी (ता.२०) सर्वांनीच निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन निवडणूक आयोगाने केले आहे.

मागील पाच वर्षे ही राज्याच्या वाटचालीत प्रचंड धामधुमीची ठरली, सत्तेसाठी झालेल्या अनैसर्गिक आघाड्या अन् युत्या, पक्षऊ‌टीनंतर झालेली सत्तांतरे आणि खरा पक्ष आणि चिन्ह नेमके कोगाच्या मालकीचे? यावरून न्यायालयात प्रलंबित असलेले वाद हे सगळे खेळ महाराष्ट्राने अनुभवले, मागील पंधरा दिवसांपासून राणामध्ये प्रचाराची रणधुमाळी सुरू होती. आज जाहीर प्रबार सभा थांबल्यानंतर सगळ्याच पक्षांनी पडद्या मागच्या खलबतांना वेग दिला आहे. महायुतीतील मोठा भाऊ असलेल्या सत्ताधारी भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्रीस मंत्री अन् स्थानिक भाजप नेते प्रचाराच्या मैदानात उतरले होते तर शिवसेनेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिदि यांनी प्रचाराची धुरा सांभाळला. राज्यात भाजपकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रचारातील प्रमुख चेहरा उरले महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे नेते राहुल गांधी, सरचिटणीस, प्रियांका गांधी-वद्रा यांच्यासह ज्येष्ठ नेते शरद पवार आणि ठाकरेंच्या पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रचार केला. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांकडून अन्य राज्यांतील मुख्यमंत्र्यांची फौज प्रचाराच्या मैदानात उतरविण्यात आली होती.

आता मतदारच 'राजा'
विविध विकास योजनांवरून सुरू झालेला सत्ताधारी महायुतीचा प्रचार शेवटी धार्मिक ध्रुवीकरणावर येऊन ठेपल्याचे चित्र पाहायला मिळाले. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलेली 'बटेंगे तो कटेंगे' ही घोषणा चांगलीच गाजली. विरोधी पक्षांनीही महागाई, बेरोजगारी, सोयाबीनला भाव नसणे आदी मूलभूत समस्यांप्रमाणेच 'संविधान बचाओ'चा नारा दिला. मागील लोकसभा निवडणुकीच्यावेळीही राहुल यांचा प्रचार या घोषणेभोवती केंद्रित झाला होता.

बारामती येथील सभेतून ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले , "बारामतीमध्ये मी आणि अजित पवार दोघांनी काम केले असते, तरी आता नव्या पिढीकडे सूत्रे सोपविण्याची वेळ आली आहे. युगेंद्र पवार उच्चशिक्षित आणि चारित्र्यसंपत्र असून, त्यांचा मोठा जनसंपर्क आहे. आमच्यापेक्षा अधिक मेहनत युगेंद्र घेतील, यावाचत शंका नाही."

शिवसेना- ठाकरे पक्ष आपला पक्ष प्रमुख,उद्धव ठाकरे,व्हिडिओ संदेशातून म्हणाले, "पक्षाचे नाव अन् चिन्हही चोरले, शिवसेनाप्रमुखांचा फोटो चोरला एवढे चोरूनही जनतेच्या आशीर्वादाने मी अजूनही ठाम उभा आहे. तुमचे प्रेम, आशीर्वाद आणि विश्वास, हे त्यांना चोरता आहे नाही. या बळावर मी लोकशाहीसाठी या बेबंद‌शाहीच्या विरोधात उतरलो आहे."

बेलापूर येथील सभेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले , "महाराष्ट्र हे एक प्रगत राज्य आहे. देशाच्या प्रगतीचे इंजिन आहे. त्यामुळे आपल्याला महायुतीचे सरकार आणायचे आहे. माझे जनतेला हेच आवाहन आहे. मी घरात बसणारा मुख्यमंत्री नाही. मी पायाला चिंगरी लावून फिरणारा मुख्यमंत्री आहे."

 एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीतून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "अजित पवार यांचा एक है तो सेफ है'ता आक्षेप नाही ग्लास अर्धा रिकामा आहे म्हणू नका, ग्लास अर्धा भरलेता आहे म्हणा, असे त्यांचे महणणे आहे. आम्हाला त्यांची भूमिका मान्य आहे. अजित पवार यांनाही आम्ही भगवे करू."

बारामती येथील सभेतून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, "मला एकटे पाडण्याचा प्रयत्न झाला; पण आता आई आणि बहीण माझ्यासोक्त आहेत. माझी पत्नीही प्रचाराची जबाबदारी सांभाळते आहे. बारामतीकर हेच माझे कुटुंब आहे त्यामुळे मलाच विजयी करा. माझ्या विरोधात घरातील कोणी उभे राहिले, तर तो त्यांचा अधिकार आहे."

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp 
Awaz Marathi Facebook 

Awaz Marathi Twitter