तळेगाव येथील शेतकऱ्यांशी संवाद साधताना बाबासाहेब पाटील , वक्फ बोडीचे अध्यक्ष समीर काझी, आमदार अभिमन्यू पवार.
वक्फ ट्रिब्यूनलमध्ये एका व्यक्तीने दावा दाखल करून अहमदपूर तालुक्यातील तळेगाव येथील जवळपास १०० शेतकऱ्यांना जमिनीच्या ताब्याविषयी नोटीस बजावली आहे. या प्रकरणामुळे चिंतीत असलेल्या शेतकऱ्यांशी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी, आमदार अभिमन्यू पवार यांनी तळेगाव येथे बुधवारी (ता. २५) संवाद साधला. या प्रकरणातील जमिनी वक्फ बोर्डाच्या मालकीच्या नसल्याने त्यावर कोणताही हक्क सांगितलेला नाही, शेतकऱ्यांनी निश्चिंत राहावे, असे वक्फ बोडचेि अध्यक्ष समीर काझी यांनी सांगितले. या प्रकरणात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, असे मंत्री पाटील यांनी सांगितले
शेतकऱ्यांच्या जमिनीवर वक्फ बोर्डाचा दावा केल्याने अनेक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते. या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली. "काझी म्हणाले, नोटिसा बजावलेल्या जमिनींची नोंद गॅझेटनुसार वक्फ बोर्डाच्या मालकीच्या जमिनींच्या नोंदीमध्ये नाही. त्यामुळे त्यावर वक्फ बोर्डाने दावा करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तरीही शेतकऱ्यांमध्ये वक्फ बोर्डाबाबत गैरसमज निर्माण झाला आहे. त्यावर स्पष्टीकरण देण्यासाठी, भूमिका मांडण्यासाठी आम्ही शेतकऱ्यांसमोर आलो आहोत."
बाबासाहेब पाटील म्हणाले, "या प्रकरणात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील. शेतकऱ्यांना आपले म्हणणे मांडण्यासाठी आवश्यक सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी निश्चिंत राहावे."
तर आमदायर पवार म्हणाले, “औसा तालुक्यातील बुधोडा येथील शेतकऱ्यांनाही अशाच प्रकारच्या नोटिसा आल्या आहेत. तळेगाव आणि बुधोडा येथील शेतकऱ्यांना या प्रकरणात सर्व सहकार्य करण्यात येणार असून त्यांच्या जमिनी त्यांच्याच मालकीच्या राहतील."
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter