जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्लांनी आपला मित्रपक्ष काँग्रेसला 'इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन'वरून (ईव्हीएम) सुनावले आहे. वावावत भाजपच्या सुरात सूर मिसळून अब्दुल्ला म्हणाले, की तुम्ही जिंकलात की 'ईव्हीएम'वर टीका करत नाहीत आणि पराभूत झाल्यावर 'ईव्हीम'ला दोष देता. तुम्ही निवडणुकीचे निकाल का स्वीकारू शकत नाहीत ?
उमर अब्दुल्ला यांच्या पाकच्या वक्तव्यातून त्यांचा पक्ष 'नॅशनल कॉन्फरन्स' कमिशनर नाराज असल्याचे उघड झाले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये सप्टेंबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान त्यांची आणि कॉंग्रेसची आघाडी होती. हरियाना आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर कॉंग्रेसने 'ईव्हीएम'वर' संशय घेत या निवडनुकांच्या निकालावर शंका व्यक्त केली आहे. त्यांच्याकडून कागदी मतपत्रिका पुन्हा आचरणात आणण्याची मागणी होत आहे.
'पीटीआय'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत उमर म्हणाले, की याच ईव्हीएमद्वारे तुम्हाला लोकसभा निवडणुकीत शंभरपर्यंत जागा मिळाल्या तेव्हा तुम्ही विजय मिळाल्याने उत्सव साजरा केला होता. त्यानंतर काही महिन्यांनी तुम्हाला अपेक्षित यश मिळाले नाही, की तुम्ही 'ईव्हीएम' आम्हाला आवडत नसल्याची टीका केली. निवडणुकीचे निकाल नेहमी तुमाला आवडतील असे लागणार नाहीत.
तुम्ही भाजप प्रवाक्त्यांप्रमाणे बोलत आहात, असे छेडले असता उमर म्हणाले, की भाजप प्रवक्ता होण्याची पाळी ईश्वराने माझ्यावर आणू नये. मात्र, मी जे सत्य आहे ते मांडत आहे. पक्षीय धोरणे-निष्ठा वगैरे एका बाजूला पण मी जे बोलत आहे ते तत्त्वावरून आहे. या पूर्वी मी केंद्र सरकारच्या 'सेंट्रल व्हिस्टा' प्रकल्पाला पाठींबा दिला आहे. यातून माझी विचार करण्याची पद्धत दिसून येते. राजधानी दिल्लीतील 'सेंट्रल व्हिस्टा' प्रकल्पाच्या विधेयाकापेक्षा माझे वेगळे मत आहे. या प्रकल्पाच्या निमित्ताने जे घडत आहे, ती चांगली बाब आहे. मला वाटते की नवीन संसद भवन बांधणे ही एक उत्कृष्ट कल्पना होती. आम्हाला नवीन संसद भवनाची गरज होती. जुन्या संसद भवनाची उपयुक्तता संपली आहे.
विरोधकांचा विशेषतः काँग्रेसच्या 'ईव्हीएम विरोधाचा मुद्दा तुम्हाला चुकीचा वाटतो का, या प्रश्नाला उत्तर देताना उमर म्हणाले, 'मतदान यंत्रणेवर विश्वास नसेल तर पक्षांनी निवडणूक लढवू नये, मतदानयंत्रात समस्या असतील तर विरोधी पक्षांनी आपल्या 'ईव्हीएम विरोधामध्ये सातत्य ठेवावे."
'नॅशनल कॉन्फरन्स'च्या पदाधिकाऱ्याने खासगीत सांगितले, की काँग्रेसने जम्मू-काश्मीर निवडणुकीत प्रचारमोहिमेचा कोणताही भार उचलला नाही, आम्हीच निवडणुकीचा सर्व भार आमच्या खांद्यावर घेत ४२ जागा जिंकल्या, कॉंग्रेसला येथे सहा जागा मिळाल्या आहेत.
'सोयीची सबब सांगू नये'
निवडणूक निकाल वेगळे लावणारी निवडणूक मतदान यंत्र तेच आहेत. विरोधकांनी आपल्या पराभवाचे विश्लेषण करताना त्यांचा सोयीची सबब म्हणून वापर करू नये, असे सांगून उमर अब्युल्ला महणाले, की एखाद्या निवडणुकीत मतदार तुमची निवड करतात, तर कधी करत नाहीत. लोकसभा निवडणुकीत मीही पराभूत झालो, मात्र सप्टेंबामधील विधानसभा निवडणुकीत आम्हाला बहुमत मिळाले. मात्र, मी कधीही 'ईव्हीएम'ला दोष दिला नाही.