१३ हजार सदस्यांचे नेटवर्क, हवालाच्या माध्यमातून फंडिंग

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 4 d ago
प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र

 

डिसेंबर २०२० मध्ये ईडीने कँपस फ्रंट ऑफ इंडिया (सीएफआय) चे महासचिव केए रऊफ शेरिफ याला अटक केली होती. ही एकप्रकारे पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) विरोधात एकापेक्षा जास्त तपास यंत्रणांनी उघडलेल्या मोहिमेची सुरूवात होती. या कारवाईचा उद्देश या संघटनेचे संपूर्ण नेटवर्क आणि आर्थिक स्त्रोतांची माहिती मिळवणे हा होता. चार वर्षांच्या तपासानंतर ईडीने तयार केलेल्या डोजियरमधून काही धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. 

या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, पीएफआयचे शेकडो  सूचीबद्ध सदस्य आहेत. यासोबतच केरळ, कर्नाटक, तमीळनाडू, तेलंगना, दिल्ली, राजस्थान, महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल, आसाम, जम्मू काश्मीर आणि मणिपूर येथे कार्यालय आहेत. ईडीच्या डोजियरनुसार, ही संघटना २०२२ मध्ये बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंध) कायद्यांतर्गत बंदी घालण्यात आली होती, त्यावेळी जुलै मध्ये पीएम मोदींवर हल्ल्याचा प्रयत्न अयशस्वी झाला होता. या संघटनेचे सिंगापूर आणि पाच आखाती देशात किमान १३,००० सदस्य आहेत. या देशांमध्ये 'पीएफआय'ला अज्ञात दात्यांकडून आर्थिक मदत केली जाते. हा पैसा हवालाच्या माध्यमातून भारतात पाठवाला जातो. यानंतर ट्रस्ट्स आणि संबंधीत संस्थांच्या २९ बँक खात्यांमध्ये ही रोकड जमा केली जात होती.

गेल्या वर्षी काही यंत्रणांनी या संघटनेच्या २६ बड्या पदाधिकाऱ्यांना अटक केली आहे. भारत आणि परदेशातील मालमत्ता आणि बँक खाती जब्त केली आहेत. यासोबतच केरळमध्ये एक दहशतवादी शिबीर देखील आढळले होते. डोजियरमध्ये सांगण्यात आले आहे की, ही संघटना दिल्ली दंगली, हाथरसमध्ये अशांतता आणि जुलै २०२२ मध्ये पटना येथे रॅलीदरम्यान पीएम मोदी यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यामागे देखील त्यांचा हात होता. २०२२ मध्ये अटक करण्यात आलेल्या लोकांमध्ये सीएफआयचा राष्ट्रीय महासचिव रऊफ शेरिफ, कतारमध्ये पीएफआयचा सदस्य शफीख पायेथ, दिल्ली पीएफआय अध्यक्ष परवेज अहमद आणि सिंगापूर येथून पीएफआयसाठी हवाला चालवणाऱ्या साहुल हमीद हे प्रमुख आहेत.

ईडीने सांगितले की पीएफआयचा उद्देश जिहादच्या माध्यमातून भारतात इस्लामी आंदोलन चालवणे हा होता. असे असले तरी पीएफआय स्वतःला सामाजिक आंदोलनाच्या स्वरूपात दाखवत असे. पुरव्यांमधून माहिती समोर आली आहे की त्यांच्याकडून वापरण्यात आलेले विरोधाचे मार्ग हिंसक स्वरूपाचे आहेत. तपास यंत्रणांनी सांगितेल की केरळच्या कन्नूर जिल्ह्याच्या नारथ येथे एक हत्यार प्रशिक्षण शिबीर सापडले होते. येथे पीएफआय फिजिकल एजुकेशन क्लासेसच्या आडून स्फोटके आणि हत्यारांच्या वापराबद्दल प्रशिक्षण दिले जात होते. आतापर्यंत मनी ट्रेलमधून पीएफआय आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून ९४ कोटी रुपयांहून अधिक वसूलीचा खुलासा करण्यात आळा आहे. ईडीने ५७ कोटी रुपयांची संपत्ती जब्त केली आहे. ही संघटना कुवैत, ओमान, कतार, साऊदी अरेबिया आणि युएई मध्ये सक्रिय असल्याचे आढळून आले आहे. या देशांमधून या संघटनेला बहुतांश फंडीग दिली जाते.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter