'यामुळे' दाखल करणार बदनामीचा खटला - नवाब मलिक

Story by  आवाज़ मराठी | Published by  admin2 • 2 Months ago
File Photo
File Photo

 

मुंबई

“दाऊदशी संबंध असल्याचे माझ्यावर जे आरोप करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार आहे.. गुन्हेगारी अथवा दहशतवादाचा कोणताही खटला माझ्यावर नसून जे लोक अशा प्रकारचे बिनबुडाचे आरोप करीत आहेत त्यांच्याविरोधात न्यायालयात धाव घेणार आहे. या सर्वांवर बदनामीचा खटला दाखल करणार आहे, अशा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना दिला.

मलिक यांना उमेदवारी देण्यास महायुतीमधून विरोध केला आहे. मात्र मानखुर्द -शिवाजीनगर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांना ऐनवेळी ‘एबी’ अर्ज दिला. ‘राष्ट्रवादी’च्या या कृत्याने भारतीय जनता पक्षात नाराजी आहे. गुंड दाऊद याच्याशी मलिक यांचे संबंध असल्याचे कारण देत यांच्या प्रचाराला जाणार नसल्याचे भाजपच्या नेत्यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. मात्र आरोप करणाऱ्यांना न्यायालयात खेचणार असल्याचे गत मलिक यांनी भाजप नेत्यांना अप्रत्यक्ष इशारा दिला आहे.

न्यायालयीन कारवाईविषयी बोलताना मलिक यांनी कोणीही आणि कितीही मोठा नेता असला, तरी कायदेशीर कारवाई करणार असल्याचे सांगितले. माझ्या प्रचाराला या, असा मी कोणालाही आग्रह केलेला नाही. जनतेचे पाठबळ माझ्या पाठीशी आहे. त्या आधारावरच निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

फडणवीस यांचा विरोध
देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात भूमिका घेतली आहे. त्याचबरोबर दाऊद इब्राहिमशी संबंधित खटल्यातील व्यक्तीच्या प्रचारात आम्ही सहभागी होणार नसल्याचे भाजप नेते आणि मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.