नागपूर हिंसाचाराचा कथित मास्टरमाइंड फहीम खानच्या घरावर बुलडोझर चालवल्या प्रकरणी नागपूर महानगरपालिका आयुक्तांनी हायकोर्टात बिनशर्त माफी मागितली आहे. फहिम खान याचे घर पाडल्या प्रकरणी मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी मंगळवारी हायकोर्टात शपथपत्र दाखल केले केले असून कोर्टाला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.
महानगरपालिकेच्या प्रशासकीय अधिकारी, नगररचना विभाग आणि झोपडपट्टी विभागाला सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची माहिती दावा या शपथपत्रात करण्यात आला आहे. नोव्हेंबर २०२४च्या आपल्या निर्णयानुसार सुप्रीम कोर्टाने बुलडोझर कारवाईवर प्रतिबंध लावला आहे. नागपुरात १७ मार्चला झालेल्या हिंसाचार प्रकरणात फहीम खान हा कथित सूत्रधार असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून देशद्रोह आणि इतर गुन्हे फहिम खानवर लावण्यात आले आहे.
महानगरपालिकेची नोटीस मिळाल्यानंतर फहिम खानची आई मेहरूनिस्सा यांनी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली होती. मात्र कोर्टात सुनावणीपूर्वीच मनपाने कारवाई करत त्याच्या आईच्या नावावर असलेले घर बुलडोजर जर कारवाई करत पाडले होते. बुलडोजर कारवाई पोलिसांच्या विनंतीवरून मनपाच्या झोपडपट्टी कायद्याअंतर्गत करण्यात आली.
नागपुरातील हिंसाचार प्रकरणात पोलिसांनी फहीम खान याच्यासह ५० दंगलखोरांवर गुन्हा दाखल केले. याप्रकरणी फहीम खानला १८ मार्चला अटक करण्यात आली होती आणि त्यानंतर पोलीस कोठडी देण्यात आली. फहीम खानने स्वतः या प्रकरणात चुकीच्या प्रकारे गुंतविले जात असल्याचा दावा याचिकेत केला होता. राजकीय बदला घेण्यासाठी त्याला गुंतविण्यात येत असल्याचे त्याने म्हटले होते.