देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात जातीनिहाय समीकरण साधल्याचे दिसत आहे. हसन मुश्रीफ यांच्या रूपाने एकमेव मुस्लीम चेहरा मंत्रिमंडळात असेल. १६ मराठा, १७ ओबीसी चेहरे मंत्रिमंडळात आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रविवार पार पडला. ३३ कॅबिनेट आणि ६ राज्यामंत्र्यांनी शपथ घेतली. एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळात ४२ मंत्री झाले आहेत. मंत्रिमंडळ विस्तारात महायुतीमधील अनेक दिग्गजांना डच्चू देण्यात आला. यामध्ये मुनगंटीवार, भुजबळ आणि केसरकर यांचा समावेश आहे. नितेश राणे, माधुरी मिसाळ, भरत गोगावले यांच्यासह २० नवे चेहरे मंत्रिमंडळात आहेत.
फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात मराठा आणि ओबीसी समजाला तुल्यबल स्थान देण्यात आले. ४२ मंत्र्यांपैकी १६ मराठा तर १७ ओबीसींच्या विविध जातींचे मंत्री आहेत. कोल्हापूरमधील हसन मुश्रीफ यांच्या रूपाने एकमेव मुस्लिम चेहरा मंत्रिमंडळात आहे. तर देवेंद्र फडणवीस यांच्यासह दोन ब्राह्मण समाजाचे मंत्री असतील. कुणबी समाजाचे तीन, बंजारा समाजाचे दोन, वंजारी समाजाचे तीन मंत्री आहेत.
मराठा समाजाचे मंत्री कोण कोण :
१) राधाकृष्ण विखे पाटील
२) चंद्रकांत पाटील
३) नितेश राणे
४) शिवेंद्रराजे भोसले
५) मेघना बोर्डीकर
६) आशिष शेलार
७) एकनाथ शिंदे
८) शंभूराज देसाई
९) योगेश कदम
१०) भरत गोगावले
११) प्रकाश आबिटकर
१२) दादा भुसे
१३) अजित पवार
१४) बाबासाहेब पाटील
१५) मकरंद पाटील
१६) माणिकराव कोकाटे.
ओबीसी :
१) गिरीश महाजन (गुर्जर)
२) चंद्रशेखर बावनकुळे (तेली)
३) पंकजा मुंडे (वंजारी)
४) प्रताप सरनाईक (कुणबी)
५) अतुल सावे (माळी)
६) जयकुमार गोरे (माळी)
७) पंकज भोयर (कुणबी)
८) गणेश नाईक (आगरी)
९) आकाश फुंडकर (कुणबी)
१०) अदिती तटकरे (गवळी)
११) दत्ता भरणे (धनगर)
१२) धनंजय मुंडे (वंजारी)
१३) गुलाबराव पाटील (गुर्जर)
१४) संजय राठोड (बंजारा)
१५) इंद्रनील नाईक (बंजारा)
१६) आशिष जयस्वाल (कलाल)
१७) जयकुमार रावल (राजपूत)
अनुसूचित जाती :
१) संजय सावकारे (चर्मकार)
२) संजय शिरसाट (बौद्ध)
अनुसूचित जमाती :
१) अशोक उईके (आदिवासी)
२) नरहरी झिरवाळ (आदिवासी)
मुस्लीम : १) हसन मुश्रीफ
जैन : १) मंगलप्रभात लोढा
ब्राह्मण :
१) देवेंद्र फडणवीस,
२) उदय सामत (गौड ब्राह्मण)
खुला प्रवर्ग : १) माधुरी मिसाळ (सीकेपी)