सीमावाद मिटवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करणार - डॉ. एस. जयंशंकर

Story by  आवाज़ मराठी | Published by  Saurabh Chandanshive • 3 Months ago
पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी

‘संविधान बचाओ’चा नारा देत देशभर फिरणाऱ्या काँग्रेसने गेल्या ७० वर्षांत भारतीय राज्यघटनेचे सर्वाधिक नुकसान केल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत केला. राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाला पंतप्रधान मोदी यांनी आज राज्यसभेत सविस्तर उत्तर दिले. जवळपास एक तास ५० मिनिटे केलेल्या भाषणात त्यांनी राज्यघटना, मणिपूरमधील वांशिक हिंसाचार, केंद्रीय तपास यंत्रणेची विरोधकांवर होत असलेली कारवाई, गेल्या दहा वर्षांत देशाचा झालेला विकास, परदेशात देशाची सुधारलेली प्रतिमा, महिला व युवकांना मिळालेल्या संधी व काँग्रेसच्या घराणेशाहीवर सडकून टीका केली.

मागील दोन दिवसांपासून राज्यसभेत सुरू असलेल्या चर्चेला पंतप्रधान मोदी यांनी उत्तर दिले. यावेळी ते म्हणाले, ‘‘गेल्या ६० वर्षात पहिल्यांदा सलग तिसऱ्यांदा सत्तारुढ होण्याची संधी मिळाली आहे. मागची निवडणूक राज्यघटनेच्या मुद्द्यावर लढविली गेली होती. राज्यघटना धोक्यात आल्याचा ढोल वाजवला जात होता. परंतु संविधान माझ्या कारकिर्दीत नव्हे तर १९७७ मध्ये धोक्यात होते. तेव्हा जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली ‘लोकतंत्र बचाओ’ मोहिम चालविण्यात आली होती. तेव्हा राज्यघटनेची सर्व तत्त्वे पायदळी तुडविण्यात आली होती. अनेकांना कोणतेही कारण नसताना तुरुंगात डांबण्यात आले होते. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत राज्यघटनेची मोडतोड करणाऱ्यांचा भारतीय मतदारांनी पराभव केला होता. ते आज राज्यघटना बचाओच्या बाता करीत आहे. संविधानावर आमचा विश्वास आहे, म्हणून जनतेने आम्हाला पुन्हा सत्तारुढ होण्याची संधी दिली. राज्यघटना ही माझ्यासाठी केवळ नियमांची यादी नाही,’ असेही त्यांनी यावेळी सांगितले.

गेल्या दहा वर्षांत सर्व क्षेत्रांत प्रगती झाल्याचा दावा करून ते म्हणाले, की शेतकरी, युवक व महिलांच्या जीवनामध्ये बदल झाला आहे. आज देशात युवक स्टार्टअप सुरू करून नवा अध्याय सुरू करीत आहे. कृषीच्या क्षेत्रात नवे बदल झाले आहेत. गेल्या दहा वर्षांत किमान हमी भावात (एमएसपी) सर्वाधिक वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. महिलांना येत्या काही वर्षांत तीन कोटी लखपती दिदी करण्याचा करण्याचा मनोदय आहे. ज्या महिलांनी कधीही सायकलही चालविली नाही. त्या आज ड्रोन चालवून पैसा कमवित आहे, हे दृश्य मला खूप समाधान देणारे असल्याचेही मोदी यांनी कृतज्ञतापूर्वक नमूद केले.

महिलांवरील अत्याचाराच्या घटनांचा उल्लेख करून पंतप्रधान म्हणाले, ‘‘महिलांवरील अत्याचारांनी मन विषण्ण होत आहे. परंतु विरोधक यावर काही बोलत नाहीत. पश्चिम बंगालमध्ये काही दिवसांपूर्वी एका महिलेला मारहाण करण्याचा व्हिडिओ समोर आला. त्याचप्रमाणे संदेशखालीच्या महिलांवरील अत्याचारावर विरोधक मूग गिळून आहेत, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर हल्लाबोल केला.

केंद्रीय तपास यंत्रणा स्वतंत्र
भ्रष्टाचारांवर कारवाई यापुढेही सुरू राहील, असे स्पष्ट करून ते म्हणाले, की केंद्रीय तपास यंत्रणांना पूर्ण मुभा दिली आहे. त्यामुळे भ्रष्टाचार करणार्यांवर कारवाई यापुढे सुरू राहील, असे सांगून त्यांनी ईडी-सीबीआयचा फेरा विरोधी पक्षांच्या नेत्यांवर पडणार असल्याचे स्पष्ट केले.

मणिपूर आता शांत
पंतप्रधान मोदी यांनी पहिल्यांदा मणिपूरमधील हिंसाचारावर सविस्तर निवेदन दिले. मणिपूरमध्ये दोन समुदायांमध्ये होत असलेल्या हिंसाचारावर बोलताना ते म्हणाले, की मणिपूरमध्ये ११ हजारावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जवळपास ५०० जणांना अटक करण्यात आली आहे. केंद्र व राज्य सरकारच्या समन्वयातून शांतता प्रस्थापित केली जात आहे. आता मणिपूर शांत होत आहे. याच मणिपूरमध्ये काँग्रेसने यापूर्वी नऊ वेळा राष्ट्रपती राजवट लावली होती, असा दाखलाही त्यांनी दिला.

सत्तेसाठी एकत्र
एकेकाळी काँग्रेसवर टीका करणारे समाजवादी पक्ष व आम आदमी पक्षाचे नेते सोबत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करून ते म्हणाले, ‘सपच्या नेत्यांनासुद्धा आणिबाणीच्या काळात तुरूंगात राहावे लागले होते. ते आज काँग्रेससोबत आहेत. आपच्या नेत्यांवर काँग्रेसने आरोप केले होते. त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी ईडीकडे केली होती. परंतु आज आप व काँग्रेस एकत्र आहेत, हा विरोधाभास असल्याचेही त्यांनी सांगितले.