मायक्रोसॉफ्ट भारतात करणार 'इतकी' मोठी गुंतवणूक

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 d ago
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला

 

माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी मायक्रोसॉफ्ट देशामध्ये क्लाउड अन् आर्टिफिशियल इंटेलिजन्सशी (एआय) संबंधित पायाभूत सेनेचा विस्तार करणार असून, त्यासाठी ३ अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्यात येईल, अशी माहिती कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सत्य नाडेला यांनी आज दिली. 

सध्या देशामध्ये आर्थिक वाढीचा मोठा वेग दिसून येतो, लोक है वेगवेगळ्या आघाडीवर काम करण्यासाठी उत्सुक अहित. ते स्वतःला मल्टी एजेंटच्या रूपामध्ये पुढे आणू पाहत आहेत. आम्ही अतिरिक्त ३ अब्ज डॉलरची गुंतवणूक करत आहोत. आमची कंपनी देशामध्ये मोठ्या प्रादेशिक विस्तारासाठी आग्रही आहे. देशातील प्रत्येक व्यक्ती आणि संघटना यांना सक्षम करणे हे मायक्रोसॉफ्टचे ध्येय आहे. देशातील मनुष्यबळाच्या भांडवलाचा विकास होणे गरजेचे असून त्याने तंत्रज्ञानातील बदलाचे देखील फायदे घ्यायला हवेत. त्यामुळेच आम्ही आमची कटिबद्धता आजपासून जाहीर करत आहोत. आतापर्यंत आम्ही त्यालाच प्राधान्य दिले आहे.

पंतप्रधान मोदींशी चर्चा
नाडेला यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांच्याशी विविध मुक्ष्यांवर चर्चा केली होती. तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता हे दोन घटक केंद्रस्थानी होते. नाडेला यांनी 'एक्स' या समाजमाध्यमावर नोंदविलेल्या प्रतिक्रियेत पंतप्रधान मोदी यांचे आभार मानतानाच भारतासाठी 'एआय फर्स्ट'ची घोषणा केली होती. प्रत्येक भारतीय नागरिकाला 'एआय'चा लाभ मिळवून देण्यासाठीही आम्ही कटिबद्ध असल्याचे त्यांनी म्हटले होते.

वेगळ्या रिजनची निर्मिती
मायक्रोसॉफ्ट ही कंपनी आझूर ब्रँड खाली देशभर क्लाउड कॉम्प्युटिंगची सेवा पुरविण्याचे काम करते. कंपनीने उद्योग विस्तारीकरणासाठी ६० वेगवेगळ्या रिजनची निर्मिती केली असून त्या-त्या भागांत कंपनीचे ३०० पेक्षाही अधिक डेटा सेंटर आहेत. कंपनीने स्वतःच्या कामाची मध्य, दक्षिण, पश्चिम आणि दक्षिण मध्य अशी वेगवेगळ्या भागांत विभागणी केली आहे. आम्ही आमच्या विस्तारीकरणाला 'जिओ'सोबत देखील पुढे नेत आहोत, असे नाडेला यांनी म्हटले आहे.