पंतप्रधानांच्या काश्मीर दौऱ्यापूर्वी भारतीय सैन्याची मोठी कारवाई

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pradnya Shinde • 4 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यापूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. पंतप्रधान शनिवारी केंद्रशासित प्रदेशाला भेट देणार आहे. ते डोडा येथील स्टेडियमवर प्रचारसभेला संबोधित करणार आहेत.

देशाच्या पंतप्रधानांनी यापूर्वी १९८२ मध्ये डोडाला भेट दिली होती. जम्मू-काश्मीरमध्ये तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात बारामुल्ला, कुपवाडा आणि बांदीपोरा जिल्ह्यात १ ऑक्टोबर २०२४ रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे पंतप्रधानांच्या दौऱ्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं आहे.

त्यापूर्वीच मोठी घडामोड घडली आहे. भारतीय लष्कराने दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. काल रात्रीपासून अनेक ठिकाणी चकमकी सुरू होत्या. बारामुल्ला परिसरात सुरू असलेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा झाला. आजूनही काही दहशतवादी लपल्याची माहिती असल्याने सर्च ऑपरेशन सुरू आहे.

दहशतवादी नेमके कुठल्या संघटनेशी संबंधित आहेत आणि त्यांची ओळख पटवण्याच काम सुरू आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. त्यापूर्वीच ही मोठी कारवाई लष्कारने केली आहे.