महादेव बेटिंग अ‍ॅपचा मालकाला अखेर बेड्या

Story by  आवाज़ मराठी | Published by  admin2 • 3 d ago
सौरभ चंद्राकर
सौरभ चंद्राकर

 

महादेव बेटिंग अ‍ॅपचा मालक आणि मास्टरमाइंड सौरभ चंद्राकरला पोलिसांनी अटक केली आहे. दुबईमध्ये पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीच्या विनंतीवरून इंटरपोलच्या रेड कॉर्नर नोटीस अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. यूएईच्या अधिकाऱ्यांनी सौरभ चंद्राकरला अटक केली अल्याची माहिती भारत सरकार आणि सीबीआयला दिली आहे. सौरभ चंद्राकरला आठवडाभरामध्ये भारतामध्ये आणण्यात येणार आहे. सौरभ चंद्राकरने महादेव बेटिंग अ‍ॅपद्वारे लाखो लोकांची मोठी फसवणूक केली आहे.

सौरभ चंद्राकरच्या अटकेची बातमी मिळाल्यानंतर आता त्याच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. सौरभ चंद्राकरला लवकरच भारतात आणण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सौरभ चंद्राकरला डिसेंबर २०२३ मध्ये यूएईमध्ये ताब्यात घेण्यात आले होते तेव्हापासून तो दुबई पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याला भारतात पाठवण्याची जवळपास सर्व औपचारिकता पूर्ण झाली असून येत्या १० दिवसांत त्याला भारतात आणले जाईल, अशी माहिती ईडीच्या सूत्नी दिली आहे.

महादेव बॅटिंग ॲपचा सूत्रधार सौरभ चंद्राकर याला आठवडाभरात भारतात आणले जाऊ शकते. सौरभ चंद्राकरला डिसेंबर २०२३ मध्ये दुबईमध्ये पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तेव्हापासून तो पोलिसांच्या ताब्यात होता. ईडी किंवा अंमलबजावणी संचालनालयाच्या कारवाईमुळे सौरभला २०२३ मध्ये यूएईमध्ये ताब्यात घेण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, सौरभ चंद्राकरला साधारण आठवडाभरात भारतात आणले जाईल. ईडीच्या विनंतीवरून सीबीआय आणि परराष्ट्र मंत्रालयाने ही कारवाई केली आहे.

सौरभ चंद्राकरच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. रेड कॉर्नर नोटीस जारी झाल्यानंतर डिसेंबर २०२३ मध्ये सौरभ चंद्राकरला यूएईमध्ये ताब्यात घेण्यात आले आणि तेव्हापासून तो पोलिसांच्या ताब्यात आहे. ईडीच्या कारवाईवरून सौरभला २०२३ मध्ये ताब्यात घेण्यात आले होते. सौरभ चंद्राकर यांच्यासाठी दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्रालयांमध्ये सहमती झाली आहे. सौरभ चंद्राकर हा सुमारे ५ हजार कोटींच्या फसवणुकीचा सूत्रधार आहे.

महादेव बेटिंग ॲप ऑनलाइन बेटिंगसाठी तयार करण्यात आले होते. यावर यूजर्स पोकर, कार्ड गेम्स, चान्स गेम्स नावाचे लाईव्ह गेम्स खेळायचे. क्रिकेट, बॅडमिंटन, टेनिस, फुटबॉल आणि निवडणुकांसारख्या खेळांवर सट्टेबाजीही ॲपद्वारे केली जात होती. अवैध सट्टेबाजीच्या जाळ्यातून या ॲपचे जाळे वेगाने पसरले. फक्त भारतातच नाही तर अनेक देशांमध्ये या ॲपचे जाळे पसरले होते. हे ॲप छत्तीसगडमध्ये सर्वाधिक वापरले जात होते. या ॲपद्वारे नागरिकांची कोट्यवधी रूपयांची फसवणूक करण्यात आली.