वसंत पंचमीनिमित्त महाकुंभमध्ये कोट्यवधींचे अमृतस्नान

Story by  Bhakti Chalak | Published by  Bhakti Chalak • 1 d ago
त्रिवेणी संगमावर अमृत स्नानासाठी भाविकांची गर्दी
त्रिवेणी संगमावर अमृत स्नानासाठी भाविकांची गर्दी

 

वसंत पंचमीनिमित्त तिसऱ्या अमृत स्नानची सुरुवात करून सोमवारी पहाटे ४ वाजेपर्यंत १४ कोटींहून अधिक भाविकांनी त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केले. नागा साधूंनी घाटांवर अमृतस्नानाची सुरुवात केली. 

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की, "प्रयागराज येथील महाकुंभ-२०२५ मध्ये वसंत पंचमीच्या शुभ प्रसंगी पवित्र त्रिवेणी संगमात पवित्र अमृत स्नान करून पुण्य मिळवणाऱ्या पूजनीय संत, धार्मिक नेते, सर्व आखाडे, कल्पवासी आणि भक्तांचे हार्दिक अभिनंदन!"

१३ जानेवारीला महाकुंभमेळा सुरू झाल्यापासून ३ फेब्रुवारीपर्यंत ३४ कोटी भाविकांनी पवित्र स्नान केले आहे. तर महिनाभर अध्यात्मिक तपस्या करणाऱ्या भक्तांची संख्या १ कोटीहून अधिक आहे. वसंत पंचमीच्या शुभ दिवसानिमित्त भाविकांनी एक दिवस आधीपासूनच संगम परिसरात येण्यास सुरुवात केली होती. कुंभमेळा प्रशासन, स्थानिक प्रशासन, पोलिस, स्वच्छता कर्मचारी, स्वयंसेवक, नावाडी  आणि सर्व सरकारी विभागांच्या योगदानाने हा कार्यक्रम यशस्वी झाला. या सर्वांच्या योगदानामुळे या ऐतिहासिक कार्यक्रमाचे सुरक्षित आणि सुरळीत आयोजन करणे शक्य झाले.

वसंत पंचमी दिवशीच्या तिसऱ्या अमृत स्नानासाठी स्वच्छ आणि सुरक्षित वातावरण राखण्याच्या उद्देशाने विशेष स्वच्छता व्यवस्था करण्यात आली होती. हे साध्य करण्यासाठी १५,००० स्वच्छता कर्मचारी आणि २,५०० हून अधिक गंगा सेवा दूतांनी अथक परिश्रम घेतले.