जनरल उपेंद्र द्विवेदी देशाचे नवे लष्करप्रमुख

Story by  आवाज़ मराठी | Published by  Sameer Shaikh • 4 d ago
जनरल उपेंद्र द्विवेदी
जनरल उपेंद्र द्विवेदी

 

नवी दिल्ली

देशाचे लष्करप्रमुख म्हणून जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी रविवारी मावळते लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांच्याकडून कार्यभार स्वीकारला. लष्कर प्रमुख पदाचा कार्यभार हाती घेण्यापूर्वी जनरल द्विवेदी हे लष्कराच्या उपप्रमुख पदावर कार्यरत होते. २०२२ पासून त्यांच्याकडे लष्कराच्या उत्तर विभागाची (नॉदर्न कमांड) जबाबदारी होती. जनरल द्विवेदी हे देशाचे ३० वे लष्कर प्रमुख ठरले आहेत.

१९८४ मध्ये जम्मू-काश्मीर रायफल्समध्ये सर्वप्रथम द्विवेदी यांची नियुक्ती झाली होती. नॉदर्न कमांडमध्ये कमांडर म्हणून त्यांनी दीर्घकाळ काम केले आहे. लष्करात सध्या आमूलाग्र बदल सुरू असून त्याच्या आधुनिकीकरणाचे​ही काम सुरू आहे. अशावेळी जनरल द्विवेदी यांनी लष्करप्रमुख पदाचा कार्यभार हाती घेतला आहे. चाळीस वर्षांच्या कार्यकाळात द्विवेदी यांनी जम्मू-काश्मीर रायफल्स बटालियन,२६ सेक्टर आसाम रायफल्स ब्रिगेड, नाईन कोअर अशा विभागात काम केले आहे. सैनिक शाळा रिवा, नॅशनल डिफेन्स कॉलेज आणि यूएस आर्मी वॉर कॉलेजमधून द्विवेदी यांनी शिक्षण पूर्ण केले होते.

कोण आहेत उपेंद्र द्विवेदी?
  • उपेंद्र द्विवेदी यांचा जन्म १ जुलै १९६४ रोजी झाला. ते सैनिकी स्कूल रेवाचे माजी विद्यार्थी आहेत
  • १५ डिसेंबर १९८४ रोजी ते लष्कराच्या 18-जम्मू काश्मीर रायफल्समध्ये सहभागी झाले
  • पुढे त्यांनी युनिटची कमान आपल्या हाती घेतली
  • ४० वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या
  • लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी सध्या उपलष्कर प्रमुख म्हणून कार्यभार सांभाळत आहेत
  • त्यांनी १९ फेब्रुवारी रोजी उपलष्कर प्रमुख पदाचा पदभार सांभाळला होता
  • त्यापूर्वी जनरल द्विवेदी २०२२-२०२४ पर्यंत नॉर्दन कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंन इन चिफ म्हणून कार्यरत होते
  • पूर्व लडाखच्या प्रश्नासोबत चीनशी सुरु असलेल्या चर्चेत त्यांची महत्त्वाची भूमिका होती
उपेंद्र द्विवेदी यांची लष्करी कारकीर्द 
उपेंद्र द्विवेदी हे २०२२ ते २०२४ मध्ये उधमपुरमधील नॉर्थ कमानचे जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ (जीओसीसी-इ-सी) होते. मध्य प्रदेशच्या रीवा सैनिक स्कूलचे माजी विद्यार्थी असलेले लेफ्टिनेंट जनरल द्विवेदी यांना १९८४ मध्ये जम्मू आणि काश्मीर रायफल्सचे कमीशन देण्यात आले होते. त्यांनतर त्यांनी या यूनिटचे नेतृत्व केले. द्विवेदी यांना प्रदीर्घ अनुभव आहे.

नॉर्थ सैन्याचे कमांडर असताना जनरल द्विवेदी यांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवाद विरोधी अभियान सुरू केले होते. उत्तर आणि पश्चिमी सीमांवर विविध ऑपरेशन रावबणे आणि हे ऑपरेशन सुरू ठेवण्यासाठी महत्त्वाचे मार्गदर्शन करण्याचे काम त्यांनी केले आहे.

चीन लष्कराने गलवानमध्ये केलेल्या घुसखोरीनंतर सुरु झालेल्या चर्चांमध्ये जनरल द्विवेदी यांचा सक्रिय सहभाग होता. द्विवेदी यांचा यू. एस आर्मी वॉर कॉलेज, कार्लिंस्ले, यू.एस. ए.मध्ये नॅशनल डिफेंन्स कॉलेजमधील 'विशिष्ट फेलो' म्हणून त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. त्यांच्याकडे सुरक्षा संदर्भातील अभ्यासक्रमातील एम. फिल आहे. याशिवाय सामरिक अभ्यास आणि सैन्य विज्ञानमधील दोन मास्टर डिग्री त्यांच्याकडे आहेत.