आजपासून राजधानी दिल्लीत ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज या साहित्य संमेलनाचे उद्घाटन करतील. मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी संमेलनाच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मराठी भाषा, संस्कृती आणि विविध विषयांवर चर्चा केली.
ते म्हणाले, “कोणताही देश संस्कृतीने परिभाषित होतो. एखाद्या देशाची सर्वात मोठी संपत्ती त्याची सांस्कृतिक वारसा आहे. यामध्ये जो सर्वात प्रामाणिक स्तंभ आहे, तो म्हणजे भाषा. हजारो वर्षांचा सांस्कृतिक वारसा भारताला कोणत्याही देशापेक्षा वेगळा बनवतो.”
ते पुढे म्हणतात, “आपली संस्कृती आणि भाषा जोपासणे हे आपले कर्तव्य आहे. संविधानाने आम्हाला हे कर्तव्य दिले आहे. ह्या संस्कृतीला वाव देणे आणि तिचा प्रचार करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी असे कार्यक्रम आणि संस्था आहेत. लोक साहित्याच्या जतनासाठी आणि प्रसारासाठी कठोर परिश्रम करत आहेत. त्यांचं कार्य अत्यंत कौतुकास्पद आहे.”
आपल्या संविधान निर्मात्यांनी भारताच्या संस्कृतीचा सखोल अभ्यास केला. त्यामध्ये अनेक महत्त्वाचे ठळक उदाहरणे दिली आहेत. "सत्यमेव जयते" हे वचन, मोहनजोदडोच्या सीलचा संदर्भ, हडप्पा संस्कृती आणि गुरुकुल संस्कृती ह्यांवर आधारित विचार संविधानात स्पष्टपणे दिले आहेत. आपल्या संविधानात अधर्मावर धर्माची विजय, श्रीराम, लक्ष्मण आणि सीतेचे प्रतीक, हे सर्व आदर्श दिसून येतात. याचे कारण, धर्म, सत्य आणि न्याय हे आपले पायऱ्या आहेत, ज्यावर आपल्याला टिकून राहायचं आहे, असे उपराष्ट्रपती म्हणाले.
श्री कृष्ण अर्जुनाला कुरुक्षेत्रात उपदेश करत आहेत. त्यातले मुख्य शिक्षण हे आहे - "जो सत्य आणि न्यायाचा पाठिंबा देतो, त्याचं पथ महत्त्वाचं आहे."
शिवाजी महाराज हे एक आदर्श शासक होते. त्यांनी राष्ट्रवाद आणि संघर्षाचे महत्व शिकवले. त्यांचा आदर्श आणि त्यांचा नेतृत्व शक्ती ह्या सर्व गोष्टी संविधानात ठळकपणे व्यक्त झाल्या आहेत. महाराष्ट्राची विविधता आणि त्याच्या संस्कृतीतील महत्त्वाचे लोक ह्या सर्व गोष्टी आजही भारतीय समाजात प्रभावी आहेत, असही ते म्हणाले.
भाषा आणि संस्कृती:
भाषा आणि भारतीय संस्कृतीविषयी बोलताना ते म्हणाले, “आपली संस्कृती आणि भाषा इतर देशांकडून हल्ला सहन करायला लागली होती. परंतु यामुळे आपली संस्कृती नष्ट होणार नव्हती. आपली भाषा आणि संस्कृती टिकवून ठेवणे हाच खरा इतिहास निर्माण करण्याचा मार्ग आहे.
भारतीय भाषांचा समावेश आपल्या संस्कृतीतील अमूल्य रत्ने म्हणून केला जातो. मराठी, हिंदी, आणि इतर भाषांमध्ये विदयाचे खजिनं समाविष्ट आहे. १२००-१३०० वर्षांपूर्वी संस्कृती आणि भाषेचा उन्नतीचा काळ होता. पण नंतर आक्रमण झाले आणि आपल्यावर अत्याचार केले गेले. आपली भाषा आणि संस्कृती नष्ट करण्यासाठी त्यांचे प्रयत्न होते. आपली भाषा आणि विचार व्यक्त करण्याची स्वातंत्र्य ही आपल्याला लोकशाहीत दिलेली एक महत्त्वाची परवानगी आहे.”
पुढे ते म्हणाले, “आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात, भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी मोठे प्रयत्न केले जात आहेत. तंत्रज्ञान वापरून आपली भाषा मोठ्या प्रमाणावर प्रसारित केली जाऊ शकते. या संदर्भात केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून मराठी साहित्याचा प्रसार होण्यासाठी योग्य तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याची आवश्यकता आहे. तिन दशकांनंतर राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये एक महत्त्वपूर्ण बदल झाला आहे. मातृभाषेचा वापर वाढवण्यावर जोर दिला गेला आहे. ज्यामुळे एक मुलं त्याच्या मुळ भाषेत विचार करतात आणि त्या भाषेतच त्याच्या विचारांचा विकास होतो.”
शेवटी ते म्हणाले, “लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी आणि धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी ह्या शब्दांत भारतीय संविधानातील संस्कृतीचा, समावेश आणि एकतेचा संदेश व्यक्त झाला आहे. मराठीच्या भाषेप्रती माझं प्रेम केवळ मातृभाषेसाठी नाही, तर त्याच्यातल्या विचारांसाठी आहे. भारताच्या संविधानाने दिलेल्या मुलभूत अधिकारांमध्ये धर्म, पंथ आणि जात यांच्या पलीकडे एकता आणि एकसारखं विचार करण्याचा आदर्श दिला आहे. "जाणतो मराठी" ह्या शब्दांमध्ये खूप मोठा संदेश आहे.”
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter