रशिया-युक्रेनवर युद्धावर तोडगा काढायला मदत करू - पंतप्रधान मोदी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 2 d ago
BRICS परिषदेत नरेंद्र मोदी आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट
BRICS परिषदेत नरेंद्र मोदी आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट

 

रशिया-युक्रेन संघर्षावर शांततेच्या मागनि तोडगा काढायला हवा. याबाबत भारत सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे," अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांना दिली. येथे सोळाव्या 'ब्रिक्स' संमेलनामध्ये सहभागी होण्यासाठी आलेल्या पंतप्रधानांनी पुतीन यांच्याशी द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा केली. मागील तीन महिन्यांतील हा आपला दुसरा रशिया दौरा असून, यातून दोन्ही देशांतील दृढ संबंध आणि समन्वय दिसून येतो, असे त्यांनी नमूद केले. 

"रशिया- युक्रेन संघर्ष भडकल्यापासून मी अध्यक्ष पुतीन यांच्या सातत्याने संपर्कात आहे. या मुद्यावर शांततेच्या मागनि तोडगा निघायला हवा असे आम्हाला वाटते. येत्या काळामध्ये भारत रशियाला सर्वोतपरी मदत करायला तयार आहे. या संमेलनाच्या निमित्ताने अनेक मुद्यांवर चर्चा करण्याची संधी आपल्याकडे आहे," असेही पंतप्रधानांनी नमूद केले. पंतप्रधानांनी यावेळी जुलै महिन्यातील मॉस्को दौऱ्याचा हवाला देत याआधीच्या चर्चेचा उल्लेख केला. द्विपक्षीय वार्षिक संमेलनामुळे उभय देशांतील संबंध अधिक मजबूत झाल्याचे त्यांनी सांगितले.

पंतप्रधानांचे अनोखे स्वागत 
कझान शहरामध्ये 'इस्कॉन'च्या कृष्ण भक्तांनी नृत्य करत तसेच संस्कृत भजनाचे गायन करत पंतप्रधान मोदी यांचे स्वागत केले. येथील हॉटेल कॉरस्तॉनमध्ये भारतीय समुदायाने मोदींचे आगमन होताच एकच जल्लोष केला. यावेळी 'भारत माता की जय'च्या घोषणेने सगळा परिसर दुमदुमून गेला होता. अनेकांनी यावेळी पंतप्रधानांसोबत सेल्फी घेण्यासाठी गर्दी केली होती. काही जण पारंपरिक वेशभूषा करून येथे पंतप्रधानांच्या स्वागतासाठी आले होते.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter