कारगिल युद्धात लष्कराने वापरलेली अत्याधुनिक शस्त्रे आणि उपकरणे, क्षेपणास्त्र प्रणाली, युद्धासाठी सज्ज लष्करी वाहने आणि तंत्रज्ञानातील नवनवीन शोधांचे आविष्कार. या बरोबरच बोफोर्स तोफ, मल्टी-बरेल रॉकेट लॉन्चर, इन्सास रायफल आदी अत्याधुनिक शस्त्रांचा खजिनाच नागरिकांसाठी उपलब्ध झाला आहे. स्वदेशी बनावटीने सजलेल्या आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अंतर्भाव असलेली युद्धसामग्री पाहण्यासाठी नागरिकांची शनिवारी मोठी गर्दी उसळली. 'जाणून घ्या तुमचे लष्कर' या प्रदर्शनाचा रविवार (ता. ५) हा अखेरचा दिवस होता.
देशाच्या लष्करी पराक्रमांची माहिती देणारे आणि शस्त्रसचतेचे दर्शन घडविणारे हे प्रदर्शन पुणे सोलापूर रस्त्यावरील रेसकोर्स येथे आयोजित करण्यात आले होते. सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत प्रदर्शन सर्वांसाठी खुले होते. हे प्रदर्शन पाहण्यासाठी चिमुकल्यांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वच वयोगटातील नागरिकांची गर्दी झाली होती. लष्कराच्या विशेष दलांनी वापरलेली अत्याधुनिक शरवे आणि उपकरणे, क्षेपणास्त्र प्रणाली, युद्धासाठी सज्ज लष्करी वाहने आणि तंत्रज्ञानातील नवनवीन शोध हे या प्रदर्शनाचे केंद्रबिंदु होते. परंतु, लष्कराने कारगिल युद्धात वापरलेल्या तोफा, रायफल्स व भारतीय बनावटीचे अत्याधुनिक क्षेपणास्त्र हे या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण ठरले.
प्रदर्शनातील शस्त्रे
१. बोफोर्स हॉवित्कार तोफ
ही तोफ स्वीडन बनावटीची असून आजही तोफदलात वापरली जाते. ३० किलोमीटरपर्यंत मारा करू शकेल, अशी या तोफेची क्षमता आहे. त्याच्या गोळ्याचा व्यास १५५ मिलीमीटर आहे. भारताने स्वीडनकडून तब्बल ४०० बोफोर्स तोफा विकत घेतल्या होत्या व १९९९च्या कारगिल युद्धात या तोफानी मुख्य भूमिका बजावली. ८००० फूट पेक्षा जास्त उंचीवर रणनीतिकदृष्ट्या बोफोर्स हॉवित्झरने पाकिस्तानी सैन्याविरोधात संघर्षांदरम्यान अतुलनीय अचूकता आणि अमिशक्ती दाखवत शत्रूला नेस्तनाबूत केले होते.
२. इन्सास रायफल
पुण्यातील आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट (एआरडीई) ने भारतातील पहिल्या असॉल्ट रायफलची रचना आणि विकास करण्याचे काम हाती घेतले. इन्सास या नवीन रायफलच्या चाचण्या १९८९ पर्यंत पूर्ण झाल्या आणि १९९० मध्ये इन्सास सेवेत दाखल झालो. हो रायफल कारगिल युद्धात लष्कराने वापरलेल्या मुख्य शरवांपैकी एक होती. पुण्यात विकसित झालेली ही रायफल आता पुणेकरांनी बघितली.
३. पिनाका मल्टी-बरेल रॉकेट लॉन्चर
हे रॉकेट लॉन्चर आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट (एआरडीई) संस्थेने १९८६मध्ये विकसित केले. त्याचा पहिला उपयोग लष्कराने कारगिल युद्धात केला होत्ता. डोंगर-दऱ्यांमध्ये लपून बसलेल्या पाकिस्तानी सैन्यावर जमिनीवरून हल्ला करण्यास लष्कर जेव्हा अपयशी ठरत होते, तेव्हा तोफदलाने या रॉकेट लॉन्चरचा वापर करत विजयात निर्णायक भूमिका बजावली.
प्रदर्शनाचा शेवटचा दिवस आणि रविवारी साप्ताहिक सुट्टी असल्यामुळे पुण्यातील शाळा, महाविद्यालय, नॅशनल कॅडेट कॉप्सचे (एनसीसी) विद्यार्थी, लष्करात प्रवेशाची तयारी करणारे विद्यार्थी यांसह नागरिकांनी गर्दी केली होती.
सकाळच्या सत्रात लष्करी जवानांचे मार्शल आर्ट्सचे सादरीकरण, गुररेखा बटालियनच्या जवानांची चित्तथरारक प्रात्यक्षिके, शोख समुदायाच्या गेटका संघाचे युद्धकौशल्याची प्रात्यक्षिके, बेळगावच्या मराठा लोइड इन्फंट्रीच्या जवानांची मल्लखांबाची प्रात्यक्षिके यांसह प्रशिक्षणार्थी श्वान पथकांनीही युद्धभूमीवर शत्रूशी लढताना आवश्यक कौशल्याचे केलेले सादरीकरण नागरिकांसाठी विशेष आकर्षण ठरले. भारतीय लष्कराची शौर्यगाथा, वीरता आणि अत्याधुनिकतेचे प्रदर्शन या प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून उपस्थितांना घडले.
लष्करी पराक्रमांची माहिती देणारे आणि शस्त्रसज्जतेचे दर्शन घडविणाऱ्या प्रदर्शनामध्ये बोफोर्स तोफ, पिनाका मल्टी-बॅरल ३ रॉकेट लाँचर, इन्सास रायफल, शॉर्ट स्पॅन ब्रीडिंग सिस्टीम, ड्रोन कॅमर सिस्टीम, के-९ वज्र, अत्याधुनिक स्वयंचलित तोफा आदी शस्त्रांसह चिलखती वाहने, पायदळ वाहन, रोबोटिक श्वान (म्यूल) आणि विविध प्रकारचे रणगाडे प्रदर्शनात मांडले होते. या शस्त्र आणि उपकरणांविषयी लष्कराचे जवान आणि अधिकारी उपस्थित नागरिकांना माहिती देत होते. त्यामुळे या उपकरणांसह भारतीय सेना एकत्र कसे काम करते, याची प्रचिती नागरिकांना आली.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter