काश्मीर : उन्हाच्या तडाख्यामुळे शाळांच्या वेळा बदलल्या

Story by  Pradnya Shinde | Published by  Pradnya Shinde • 2 Months ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

काश्‍मीरमध्ये सध्या उन्हाचा तडाखा जाणवत असून तेथे तापमानात मोठी वाढ झाली आहे. यामुळे येथील शाळांच्या उन्हाळी सुटीत वाढ करावी किंवा किमान शाळांच्या वेळा बदलाव्यात, अशी मागणी पालकांनी केली होती. उष्णतेची लाट लक्षात घेता त्याची दखल घेत काश्‍मीरच्या शालेय शिक्षण संचालकांनी शाळांच्या वेळा बदलल्या आहेत. तापदायक उन्हापासून सुटका होण्याचे चिन्ह तूर्त तरी दिसत नसल्याने शाळा आणि पालकांना मुलांची चिंता वाटत आहे.

शाळेतील मुलांसाठी सकाळी ८ ते दुपारी १ अशी नवीन वेळ निश्चित करण्यात आली आहे. मात्र, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दुपारी २ वाजेपर्यंत कर्तव्यावर हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.  शालेय शिक्षण विभाग (SED) अधिकाऱ्यांनी सांगितले की, याआधी उष्णतेच्या लाटेमुळे विद्यार्थ्यांच्या शाळेच्या वेळेत बदल करण्याबाबत पालक आणि इतर भागधारकांकडून अनेक निवेदने प्राप्त झाली होती.

SED आदेशाला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. काही जण त्याचे समर्थन करत आहेत, तर काहीजण विरोध करत आहेत आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत किंवा घरबसल्या ऑनलाइन क्लासेसची मागणी करत आहेत. याला पाठिंबा देणाऱ्यांचे म्हणणे आहे की अधिकाऱ्यांसाठी हा एकमेव पर्याय उरला होता कारण ताज्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे अभ्यासक्रम पूर्ण होऊ शकला नसता. विरोध करणाऱ्यांचे म्हणणे आहे की शाळेतील मुले किंवा शिक्षक, दूरच्या ठिकाणी तैनात आहेत, त्यांना खूप लवकर सोडावे लागेल आणि त्या वेळी सार्वजनिक वाहतूक पुरेशी उपलब्ध नसते. कडक उन्हात दुपारी 1 वाजता मुले शाळांमधून घराकडे निघण्यास काहींचा आक्षेप आहे. त्यामुळे चर्चा सुरू आहे. शाळकरी मुलांचे उष्णतेच्या लाटेपासून संरक्षण करण्यासाठी पावले उचलणे आवश्यक आहे परंतु त्याच वेळी त्यांच्या अभ्यासावर परिणाम होऊ नये. पालक आणि शालेय शिक्षण अधिकारी या दोघांनीही मानवी आणि व्यावहारिकदृष्ट्या विचार केला पाहिजे. सध्या उष्णतेची लाट ही एक समस्या आहे आणि ती दूर करण्यासाठी शाळांमध्ये पावले उचलली पाहिजेत. पण कधी कधी तापमान वाढले किंवा मुसळधार पाऊस झाला की शाळा बंद करण्यासाठी काही पालक किंवा इतरांकडून सोशल मीडियावर आवाज उठवला जातो.

 

 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter