देशभरात होळीचा उत्सव साजरा केला जात आहे. मात्र उत्तर प्रदेशातील संभल शहरात शांततेचे वातावरण आहे. याचे कारण होळी आहे रमजानमधील जुम्माची नमाज एकत्र आली आहे. यामुळे प्रशासनाने कडक सुरक्षा व्यवस्थेचे आयोजन केले आहे. पोलिसांनी शहरात कडक बंदोबस्त ठेवला आहे. होळी साजरी करण्यासाठी दुपारी २:३० पर्यंतचा वेळ दिला असून यानंतर शहरातील विविध मस्जिदांमध्ये जुम्माची नमाज अदा करण्यात येणार आहे.
संभलचे सीओ अनुज चैधरी यांनी सुरक्षा व्यवस्थेविषयी सांगितले की, “शहरातील विविध भागांमध्ये तीन ड्रोन तैनात केले गेले आहेत. हे ड्रोन सर्व परिसराची निगरानी करत आहेत. पोलिस फोर्स खूप मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आले आहे. प्रत्येक प्वाइंटवर सुरक्षा व्यवस्था कडक आहे. आम्ही कुठेही परिस्थिती बिगडू देणार नाही.”
संभलचे एसपी केके बिश्नोई म्हणाले, "होळीच्या दिवशी शहरातील प्रत्येक भागात पहिल्याच सत्रात होली खेळली जाईल. दुपारी २:३० वाजेपर्यंत होली खेळायला परवानगी दिली जाईल. यासाठी पोलिस दल तैनात केले आहेत. मला आशा आहे की ही होळी सर्वांना आनंद देईल. यानंतर जुमा की नमाज अदा केली जाईल."
मुस्लिम उलेमाने मुस्लिम बांधवांना विनंती केली आहे की, “सर्वांनी आपल्या घराजवळच्या मस्जिदमध्येच नमाज अदा करावी. नमाज अदा केल्यानंतर तात्काळ घरी परतावेत. होळी खेळण्याच्या ठिकाणी न जाण्याचा कृपया प्रयत्न करावा काही असामान्य परिस्थिती निर्माण झाली तर प्रशासनाला तत्काळ माहिती द्यावी.”
संभलचे खासदार जियाउर्रहमान बर्क यांनीही नागरिकांना एकमेकांच्या धार्मिक भावनांचा आदर करण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले, “होळी आणि जुम्मा दोन्ही एकाच दिवशी असल्यामुळे, कृपया एकमेकांच्या भावनांचा आदर करा. मुस्लिम बांधवांनी आपल्या घराजवळच्या मस्जिदमध्ये नमाज अदा करावीत.”
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter