जम्मू-काश्मीर : दशकभरानंतर होणाऱ्या निवडणुकीत कुणाचे पारडे जड?

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pradnya Shinde • 4 Months ago
Jammu and Kashmir election
Jammu and Kashmir election

 

केंद्रशासित प्रदेश घोषित केल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. भाजप, कॉंग्रेस, पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्स पक्षांची या निवडणुकांमध्ये प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दरम्यान २०१४ पासून तीन निवडणुकांमध्ये विजयी आणि प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या मतांमधील अंतर वाढलं आहे, तर खूप कमी जागांवर कमी फरकाने उमेदवार विजयी झाले आहे. २०१४ पासून जम्मू काश्मीरमध्ये अनेक बदलही झाले आहेत. त्यामुळे कोणत्याच पक्षालाही निवडणूक सोपी असणार नाही अनेक ठिकाणी अटतटीच्या लढती पहायला मिळण्याची शक्यता आहे.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपने देशात मोठा विजय मिळवत केंद्रात सत्ता स्थापन केली होती. मात्र जम्मू आणि काश्मीरमध्येही केवळ तीन जागा जिंकता आल्या होत्या (ज्यात तेव्हा लडाखचा समावेश होता). मेहबूबा मुफ्ती यांच्या नेतृत्वात उर्वरित तीन जागांवर पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीने (PDP)बाजी मारली होती.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकाही दशकातील सर्वात अटीतटीच्या ठरल्या होत्या. PDP,२८ जागांवर विजय मिळवत सर्वात मोठा पक्ष म्हणून राज्यात उदयाला आला होता. मात्र ८७ सदस्यांच्या सभागृहात बहुमताचा आकडा गाठता आला नव्हता. PDP ने जिंकलेल्या सर्व जागा काश्मीर प्रांतातील होत्या. या निवडणुकी भाजपने २५ जागा जिंकल्या होत्या, मात्र सर्व जागा जम्मू प्रातांतील होत्या. त्यावेळी PDP ला समर्थन देऊन भाजपने जम्मू काश्मीरमध्ये युती सरकार स्थापन केलं. फारूक अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखालील नॅशनल कॉन्फरन्सने (NC)१५ जागा जिंकल्या होत्या. २०१४ च्या लोकसभा निवडणुका होईपर्यंत नॅशनल कॉन्फरन्ससोबत असलेल्या कॉंग्रेसने १२ जागा जिंकल्या होत्या. दोन्ही पक्ष विरोधी पक्षाच्या भूमिकेत होते.

या निवडणुकीत ८७ जागांपैकी ५० विधानसभा जागा अशा होत्या ज्या एकूण मतदानाच्या १०% पेक्षा कमी फरकाने जिंकल्या होत्या. ज्यात PDP च्या १८ जागांचा समावेश आहे. तर नॅशनल कॉन्फरन्स १३, भाजपने अशा ७ आणि काँग्रेसच्या ६ जागांचा समावेश आहे. तर अपक्ष ६ जागांचाही समावेश आहे. या ५० जागांवरील सरासरी विजयाचा फरक ६७०० मतांचा होता.

कमी मतफरकारने जिंकलेल्या जागांध्ये PDP च्या सर्वाधिक जागा आहेत. मात्र कमी मतफरकारने याच पक्षाने सर्वाधिक जागा गमावल्या होत्या. ने कमी फरकाने जिंकलेल्या सर्वाधिक जागा जिंकल्या, परंतु कमी फरकाने जिंकलेल्या सर्वाधिक जागा त्यांनी गमावल्याही. यामध्ये PDP ने १८ जागांवर एकूण मतदानाच्या १० टक्क्यांपेक्षा कमी फरकाने जागा जिंकल्या होत्या. तर नॅशनल कॉन्फरन्सने १६ जागांमध्ये, काँग्रेसने ९ आणि भाजपने ३ जिंकल्या होत्या.

भाजपच्या विजयी जागांवरील मतांता फरक १४,४२८ मतांचा होता. मात्र तो मोदी लाटेचा काळ होता. तर काँग्रेसच्या विजयी जांगावरील मतांचा फरक ५,२९० तर PDP विजयी जांगावरील मतांचा फरक ३,७५४  आणि नॅशनल कॉन्फरन्सचा २,२९५ मतांचा फरक होता. ५२ जागांवर तिसऱ्या उमेदवाराने विजयी फरकापेक्षा अधिक मतं मिळवली आहेत.

२०१९ लोकसभा निवडणूक २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये, विधानसभा विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर ८७ पैकी फक्त २२ मतदारसंघांमध्ये विजयाची मार्जिन १० टक्क्यांपेक्षा कमी होती. आर्टिकल ३७० रद्द आणि जम्मू आणि काश्मीर (J&K) दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजित होण्याच्या काही महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकांमध्ये, भाजप आणि नॅशनल कॉन्फरन्सने प्रत्येकी तीन जागा जिंकल्या (लडाखसह, ज्यावर भाजपा विजय मिळवला). पीडीपीने यावेळी २०१४ मध्ये जिंकलेल्या जागाही गमावल्या गोत्या. तर काँग्रेसला खातंही उघडता आलं नाही.

विधानसभा-विभाग स्तरावर, NC ने एकूण मतांच्या १० टक्यांपेक्षा कमी फरकाने सर्वाधिक जागा जिंकल्या, ११ त्यानंतर भाजप आणि काँग्रेस प्रत्येकी तीन आणि PDP आणि सजाद गनी लोनच्या नेतृत्वाखालील पीपल्स कॉन्फरन्स ( पीसी) प्रत्येकी एक. अशा तीन विभागात अपक्षांनी आघाडी घेतली. सर्व विधानसभा विभागांमध्ये सरासरी विजयी फरक १७,000 मतांचा होता जे २०१४ च्या विधानसभा निवडणूकांच्या सरासरीपेक्षा सुमारे तीन पट जास्त आहे.भाजपचं विधानसभा मतदारसंघात विजयाचं मार्जिनमध्ये ३२,२१२ मतांचं होतं. त्यापाठोपाठ काँग्रेस २३,९८१, NC ने ३,२६८, आणि PDP ने ३२० मतांची सरासरी मार्जिन होतं. जम्मू काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा रद्द करून केंद्रशासित प्रदेश घोषित केल्यानंतर २०२२ मध्ये मतदारसंघांच्या सीमांचा पुनर्रचना करण्यात आली.

त्यानंतर नुकताच २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि नॅशनल कॉन्फरन्से २ जागा जिंकल्या. तर काश्मीर घाटीतील एक जागा फूटीरतावादी नेता अब्दुल राशिद शेख यांनी जिंकली आहे.