ऐतिहासिक चिनाब पुलावरून 'वंदे भारत!'

Story by  Bhakti Chalak | Published by  Bhakti Chalak • 21 h ago
 चिनाब रेल्वे पुलावरून धावताना वंदे भारत
चिनाब रेल्वे पुलावरून धावताना वंदे भारत

 

जम्मू-काश्मीरच्या जनतेची अनेक वर्षांची प्रतीक्षा आता संपली आहे. वैष्णोदेवी कटरा ते श्रीनगर दरम्यान वंदे भारतची चाचणी शनिवारी (दि.२५) पूर्ण झाली. या दरम्यान सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही रेल्वे जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वे पुलावरून धावली. भारतातील पहिला केबल रेल्वे पूल असलेल्या अंजी खड पुलावरूनही ही रेल्वे धावली. 

रेल्वेचे वैशिष्ट्य 
या वंदे भारतची खास रचना काश्मीर खोऱ्यातील थंड हवामानासाठी करण्यात आली आहे. कटरा ते श्रीनगर हे १९० किलोमीटरचे अंतर ही गाडी अवघ्या ३ तासांत पार करणार आहे. इतर वंदे भारतप्रमाणेच या ट्रेनमध्ये टीव्ही किंवा संगीत प्रणाली सारख्या मनोरंजन प्रणाली बसवल्या गेल्या आहेत. 

सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे देखील बसवण्यात आले आहेत. बायो-व्हॅक्यूम टॉयलेटमध्ये, म्हणजेच ट्रेनमध्ये विमानांसारखी शौचालये असतात, ती कमी पाण्याचा वापर करतात. तिकिटाची किंमत अद्याप जाहीर केलेली नाही. परंतु, असा अंदाज आहे की, एसी चेअर कारचे भाडे १ हजार ५००- १ हजार ६०० रुपये आणि एक्झिक्युटिव्ह चेअर कारचे भाडे २ हजार २००- २ हजार ५०० रुपये असू शकते. मात्र ही गाडी नेमकी कधी धावणार हे अद्याप समोर आलेले नाही. 
 
फेब्रुवारी महिन्यात होणार उद्घाटन 
वंदे भारत ट्रेन जम्मू श्रीनगर रेल्वे लिंक प्रकल्पाचा महत्त्वाचा भाग आहे. हा प्रकल्प जम्मू काश्मीरातील लोकांसाठी नवे पर्व सुरू करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते फेब्रुवारी महिन्यात त्याचे उद्घाटन होईल. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानं जम्मू काश्मीरचे लोक देशातील अन्य भागात सहजपणे पोहचवू शकतो. या रेल्वे नेटवर्कमुळे काश्मीरच्या विकासाला नवी गती मिळणार आहे.