जम्मू-काश्मीरला आता प्रतीक्षा निकालांची

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 1 d ago
 जम्मूतील मतदान केंद्रावर मतदारांची लागलेली रांग
जम्मूतील मतदान केंद्रावर मतदारांची लागलेली रांग

 

जम्मू- काश्मीरमध्ये विधानसभेच्या रिंगणातील ९० उमेदवारांचे भवितव्य हे आता इव्हीएममध्ये सीलबंद झाले आहे. कलम ३७० आणि ३५ अ हटविल्यानंतर येथील राजकारणाचा कॅलिडोस्कोपच बदलला आहे. सुमारे दहा वर्षानी होत असणाऱ्या विधानसभेच्या निवडमुकीमध्ये विरोधी पक्षांच्या जाहीरनाम्यामध्ये आणि त्यांच्या प्रचारामध्ये कोणत्याही ठोस धोरणाऐवजी भाजप विरोध जाणवत होता, तर भाजपकडूनसुद्धा या आरोपांना दिले जाणारे प्रत्युत्तर या भोवतीच यंदाच्या निवडणुकीचा प्रचार फिरत होता. अशातच रशीद इंजिनिअर यांच्या सुटकेमुळे आणि जमाते इस्लामीचे काही नेते निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने निवडणुकीचे वातावरण आणखी तापले होते. आता नागरिकांना निकालाची प्रतीक्षा लागली आहे

यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये श्रीनगर हे निवडणूक प्रक्रियेचे केंद्र असे, मात्र यंदा जम्मूकडून मिळणाऱ्या आशीर्वादाच्या बळावर राजकीय पक्षांचे भवितव्य ठरणार आहे. जम्मूमधील विविध पक्षांच्या कामगिरीवर त्या पक्षांचे आणि जम्मू-काश्मीरचे भवितव्य निश्चित होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अविनाश, जम्मू वैधील राजकीय विश्लेषक

'अपक्ष ठरणार किंगमेकर?'
जम्मू-काश्मीरमधील विविध विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार आणि छोटे-छोटे पक्ष है यंदाच्या विधानसभा निवडणुकीत 'किंगमेकर' ठरतील, असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे, सज्जाद लोन, रशीद इंजिनिअर यांसारख्या नेत्यांनी लोकसभा निवडणुकीत नेशनल कॉन्फरन्सचे उमर अब्दुल्ला यांचा पराभव केल्याने त्यांच्या पक्षांचा विधानसभेच्या निवडणूक निकालावर परिणाम होणार आहे. आगामी काळात भिन्न विचारधारा असलेले पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थापन करू शकतात, असा कयास आहे.

सर्वाधिक जागा जिंकण्याचा प्रयत्न
जम्मू-काश्मीरमध्ये सत्ता मिळविण्यासाठी बहुमताची संख्या ४६ आहे. मात्र बहुमत मिळाले नाही तरी किमान निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकण्याचा भाजप आणि काँग्रेस व नॅशनल कॉन्फरन्सचा प्रयत्न आहे. रशीद इंजिनिअर यांच्या अवामी इत्तेहाद पक्षाला पाच ते सहा जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. रशीद यांच्या पक्षाला उत्तर काश्मीरमधून चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे मेहबुबा मुफ्ती यांच्या पीपल्स डेमॉकॅटिक पक्षालादेखील (पीडीपी) या निवाणुकीत बऱ्यापैकी यश मिळेल अशी अपेक्षा आहे. गुलाम नबी आझाद यांचा निक्पलावर फार प्रभाव पाहू शकणार नसल्याचे राजकीय अभ्यासकांचे मत आहे.

दिग्गजांना तगडे आव्हान
अपना पार्टीचे प्रमुख अल्ताफ बुखारी, पीपल्स कॉन्फरन्सचे प्रमुख सज्जाद लौन, कोग्रेसचे जम्मू-काश्मीरचे प्रमुख तारिक हमीद कर्रा, भाजपचे जम्मू-काश्मीरचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र रैना आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जम्मू-काश्मीरचे प्रदेशाध्यक्ष एम. वाय. तारिगामी हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून त्यांच्या मतदारसंघातून त्यांना तगडे आव्हान असल्याने ही निवडणूक त्यांच्यासाठी सोपी ठरली नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter