जम्मू काश्मीरच्या पुंछ सेक्टरमध्ये लष्कराच्या वाहनाला अपघात झाला आहे. या अपघातामध्ये पाच जवानांचा मृत्यू झाल्याची माहिती येतेय. घटनास्थळी बचावकार्य सुरु असून जखमी जवानांना रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
जम्मू काश्मीरमध्ये लष्काराच्या वाहनाला मोठा अपघात झाला आहे, पुंछ भागातल्या नियंत्रण रेषेजवळ सेनेचं वाहन दरीमध्ये कोसळल्याची घटना घडली. या घटनेत पाच जवानांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लष्कराचं एक वाहन तब्बल ३०० फूट खोल दरीमध्ये कोसळलं. घटनेची माहिती मिळताच अनेक पोलिस आणि लष्करी जवान अपघात स्थळी दाखल झाले.
नीलम मुख्यालयापासून बलनोई घोरा पोस्टाकडे निघालेल्या ११ एमएलआयच्या एका वाहनाला मंगळवारी हा अपघात झाला. मंगळवारी सायंकाळी ही भीषण घटना घडली. चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे. त्यानंतर लष्काराची गाडी ३०० फूट खोल दरीमध्ये कोसळली.
प्राथमिक माहितीनुसार, अपघातामध्ये पाच जवानांचा मृत्यू झाला आहे. अजूनही बचावकार्य सुरु आहे. जखमी सैनिकांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. मृत जवानांची नावं अद्याप समोर आलेली नाहीत.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter