जम्मू-काश्मीरमध्ये आज पहिल्या टप्प्यातील मतदान

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

जम्मू व काश्मीरमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदारसंघांमध्ये आज, बुधवारी मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात २४ मतदारसंघात मतदान होणार आहे. जम्मू व काश्मीरमध्ये तीन टप्प्यात मतदान होणार आहे.

अखेरच्या टप्प्यातील मतदान १ ऑक्टोबरला होणार असून मतमोजणी येत्या 8 ऑक्टोबरला होणार आहे. या टप्प्यात जवळपास २० लाख ३० हजार मतदार मताधिकार बजाविणार आहेत. या टप्प्यात ट्राल, पुलवामा, राजपोरा, शोपियान, कुलगाम, अनंतनाग, पहलगाम, किश्तवार, डोडा, बानीहाल या मतदारसंघांचा प्रामुख्याने समावेश आहे.
 
 

या मतदानासाठी मतदानाची पूर्ण तयारी झाली असून सुरक्षेच्या उपाययोजना केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. या लढतीत प्रामुख उमेदवारांमध्ये नॅशनल कॉन्फरंसचे हसनैन मसुदी (पाम्पोर), मोहम्मद खलील बंड (पुलवामा), काँग्रेसचे सुरिंदर सिंग (ट्राल) यांचा समावेश आहे.